रेल्वेत नोकरी करु इच्छिणाऱ्या तरुणांसाठी रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाकडून महत्त्वाची घोषणा
केवळ तेच उमेदवार अतिरिक्त पात्रता उमेदवारी अर्जाला जोडू शकतात ज्यानी ३१ मार्च २०१८ किंवा त्यापूर्वी अर्ज केले आहेत.
रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाने (RRB)असिस्टंट पायलट आणि टेक्नीशियन पदासाठी महत्त्वाची सूचना प्रसिद्ध केली आहे. पहिल्या टप्प्यात सीबीटी (भरती परीक्षा) साठी अनेक उमेदवारांनी नोकर भरतीसाठी अर्ज केले होते. या उमेदवारांपैकी ज्यांच्याजवळ १२वी पास ( गणित आणि भौतिकशास्त्र) आणि आयटीआयचे पात्रता प्रमाणपत्र आहे. मात्र, अर्ज करताना त्यांनी त्याची विस्तारीत माहिती दिली नव्हती. अशा मंडळींना आता एक चांगली संधी आहे. असे उमेदवार आपली अतिरिक्त पात्रता उमेदवारी अर्जासोबत जोडू शकतात.
उमेदवार आपली सर्वा प्रकारची पात्रता जसे की, भौतिक शास्त्र, गणितमध्ये एएससी (१०+२), डिप्लोमा, डिग्री, एक किंवा त्याहून अधिक आटीआय प्रमाणपत्रे जोडू शकतात. दरम्यान, केवळ तेच उमेदवार अतिरिक्त पात्रता उमेदवारी अर्जाला जोडू शकतात ज्यानी ३१ मार्च २०१८ किंवा त्यापूर्वी अर्ज केले आहेत.
दरम्यान,अनेक उमेदवारांनी आरआरबी पदासाठी प्राधान्यक्रम आणि परीक्षा ट्रेडमध्ये वेळ मागितला आहे. आरआरबीने या उमेदवारांना वेळ देण्याचाही निर्णय घेतला आहे. या निर्णयाची माहिती देण्यासाठी आरआरबीने आपल्या वेगवेगळ्या अधिकृत वेबसाईट्सवर मॉडिफिकेशन लिंक अॅक्टीवेट केल्या आहेत. या लिंक एक ऑक्टोंबर म्हणजेच आजपासून अॅक्टीवेट करण्यात आल्या आहेत.
मॉडिफिकेशन पूर्ण करण्याची शेवटची तारीख ६ ऑक्टोबर असणार आहे. त्यानंतर मॉडिफिकेशनबाबतचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. ज्या उमेदवारांकडे योग्य पात्रता आहे. मात्र, ते अद्यापपर्यंत आपला अर्ज करु शकले नाहीत अशा उमेदवारांनाही १ ऑक्टोबर २०१८ पासून वेबसाईट्सवर लॉगिन करु शकतात.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.