RBI Summer Internship 2022: इंटरनशिपसाठी येत्या 31 डिसेंबर पर्यंत करता येईल अर्ज, जाणून घ्या अधिक
या पदासाठी 15 ऑक्टोंबर पासूनच अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तर येत्या 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याची अंतिम तारीख दिली गेली आहे.
RBI Summer Internship 2022: भारतीय रिजर्व बँकेत समर इंटर्नशिप 2022 साठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदासाठी 15 ऑक्टोंबर पासूनच अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तर येत्या 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याची अंतिम तारीख दिली गेली आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांना आरबीआयच्या समर इंटर्नशिपसाठी अर्ज करायचा असेल त्यांनी अधिकृत वेबसाइट opportunities.rbi.org.in ला भेट द्यावी.
अर्ज करण्यासाठी तुम्ही डायरेक्ट लिंकसाठी येथे क्लिक करा. जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशनुसार, वर्षभराच्या इंटर्नशिपसाठी एकूण 125 उमेदवारांची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 20 रुपये स्टाइपेंट दिले जाईल. तर ही इंटर्नशिप एप्रिल 2022 पासून सुरु होईल. यासाठी परदेशातील विद्यार्थ्यांना सुद्धा अर्ज करता येईल.
अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शॉर्टलिस्ट करण्यात येईल. त्यानंतर जानेवारी आणि फेब्रुवारी 2022 मध्ये इंटरव्यू होईल. तर मार्च मध्ये निकाल घोषित केले जातील.(HAL Recruitment 2021: हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये स्टाफ नर्स पदासाठी नोकर भरती, जाणून घ्या अधिक)
>>इंटर्नशिपसाठी 'या' पद्धतीने करा अर्ज
-प्रथम विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइट opportunities.rbi.org.in येथे भेट द्यावी
-होम पेजवर दिलेल्या Summer Placements सेक्शनवर क्लिक करा
-आता Online Web based application form च्या लिंकवर क्लिक करा
-येथे विचारण्यात आलेली सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्र जोडा
-अर्ज सबमिट केल्यानंतर अखेर प्रिंट काढून ठेवा
समर इंटर्नशिपसाठी मॅनेजमेंट, स्टॅटिसटिक्स, लॉ, इकोनॉमिक्स, बँकिंग, फायनान्स मध्ये ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएश करत असलेले विद्यार्थी अर्ज करु शकतात. त्याचसोबत तीन वर्षांची प्रोफेशनल डिग्री पूर्ण झालेल्या उमेदवारांना सुद्धा अर्ज करण्याची संधी दिली गेली आहे.