2020 च्या नव्या वर्षात खासगी क्षेत्रात तब्बल 7 लाख नवीन नोकऱ्यांची संधी उपलब्ध होणार

तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. कारण 2020 च्या या नव्या वर्षात खासगी क्षेत्रात उमेदवारांना तब्बल 7 लाख नोकऱ्यांची संधी उलब्ध होणार असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहेत. देशाची अर्थव्यवस्था आता सुरळीत मार्गावर येण्यास सुरुवात झाली असल्याने नोकरीची संधी सुद्धा आता चालून येणार आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

तुम्ही यंदाच्या वर्षात नव्या नोकरीच्या शोधात आहात. तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. कारण 2020 च्या या नव्या वर्षात खासगी क्षेत्रात उमेदवारांना तब्बल 7 लाख नोकऱ्यांची संधी उलब्ध होणार असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहेत. देशाची अर्थव्यवस्था आता सुरळीत मार्गावर येण्यास सुरुवात झाली असल्याने नोकरीची संधी सुद्धा आता चालून येणार आहे. MyHiringClub.com आणि Sarkari-Naukri.info यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार अनेक खासगी कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळणार असल्याचे म्हटले आहे.

सर्वेक्षणानुसार 42 शहारांमधील 4278 कंपन्या नोकर भरती करण्याचे दिसून आले आहे. तर 2009 मध्ये करण्यात आलेल्या सर्वेनुसार 6 लाख नोकऱ्यांची संधी उपलब्ध होईल असे दिसून आले होते. त्यापैकी 5 लाख 90 हजार रोजगार निर्माण झाला होता. 2020 या वर्षात 12 विविध औद्योगिक क्षेत्रात रोजगार निर्मिती होणार आहे. यामध्ये बहुतांश स्टार्टअप कंपन्यांचा समावेश असून ते मोठ्या प्रमाणात उमेदवारांना नोकरीची संधी देणार आहेत.नोकरीची संधी उपलब्ध होण्यासोबत वेतनवाढ आणि बोनस मध्ये सुद्धा सरासरी वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 8 टक्क्यांपर्यंत वेतनवाढ आणि 10 टक्के बोनस वाढ असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.(DRDO MTS Recruitment: 'डीआरडीओ'मध्ये 1,817 पदांसाठी नोकरभरती सुरु; 10 वी पास उमेदवार करू शकतात अर्ज)

 तर मध्य रेल्वेमध्ये अनेक पदांवर भरती होणार आहेत. रेल्वेने अ‍ॅप्रेंटिस (Apprentice) पोस्टसाठी अर्ज मागविले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार 22 जानेवारी 2020 रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. त्याअंतर्गत एकूण 2562 पदे भरली जातील. या नियुक्त्या वेगवेगळ्या विभागांमध्ये/कार्यशाळांमध्ये आणि युनिटसाठी वेगवेगळ्या ट्रेडमध्ये केल्या जातील.

2020 च्या नव्या वर्षात खासगी क्षेत्रात तब्बल 7 लाख नवीन नोकऱ्यांची संधी उपलब्ध होणार Watch Video

इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. महत्वाचे म्हणजे या पदांसाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा कोणतीही मुलाखत होणार नाही. निवड दहावीच्या गुणांच्या आधारे केली जाणार आहे.