मुंबई महापालिका CBSE Board School आणि ICSE Board School विद्यार्थी प्रवेश अंतिम यादी जाहीर, पाहा कोणकोणत्या शाळांचा समावेश

या याद्यांमध्ये प्रत्येक यादीत 38 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या तीन याद्या ज्युनिअर केजी, सिनिअर केजी आणि इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्याची आहे.

BMC conducting online lottery for admissions in CBSE and ICSE schools (Photo Credits: Twitter/BMC)

मुंबई महापालिकेने आपल्या CBSE Board आणि ICSE Board शाळांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची अंतिम यादी जाहीर केली आहे. मुंबई महापालिकेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर या शाळांतील विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पालिकेच्या ट्विटनुसार पूनम नगर मुंबई पब्लिक स्कूल, जोगेश्वरी या सीबीएसई बोर्डाच्या शाळेची आणि आयसीएसई बोर्डाच्या वोलेन मिल्स मुंबई पब्लिक स्कूल, माहीम या शाळांची ही यादी जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, पूनम नगर मुंबई पब्लिक स्कूल, जोगेश्वरी या सीबीएसई शाळेमध्ये एकूण चार याद्या जाहीर झाल्या आहेत. या पैकी प्रत्येक यादीत 38 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ही यादी ज्युनिअर केजी, सिनिअर केजी, इयत्ता पहिली आणि इयत्ता दुसरीच्या यादीचा समावेश आहे. (हेही वाचा, BMC च्या CBSE आणि ICSE शाळांच्या प्रवेशासाठी आज निघणार ऑनलाईन लॉटरी; 10 मे रोजी जाहीर होणार विद्यार्थ्यांची अंतिम यादी)

बीएमसी ट्विट

बीएमसी ट्विट

आयसीएसई बोर्डाच्या वोलेन मिल्स मुंबई पब्लिक स्कूल, माहीम या शाळेच्याही एकूण तीन याद्या जाहीर झाल्या आहेत. या याद्यांमध्ये प्रत्येक यादीत 38 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या तीन याद्या ज्युनिअर केजी, सिनिअर केजी आणि इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्याची आहे.