MSCE Pune Scholarship Result 2022: 5वी, 8वी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर; mscepune.in वर पहा मार्क्स
MSCE चे अधिकृत संकेतस्थळ mscepune.in आणि mscepuppss.in वर विद्यार्थ्यांना आपला 5वी आणि 8वीचा स्कॉलरशीप परीक्षेचा निकाल पाहता येणार आहे.
5th,8th Scholarship Exam Result 2022: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून MSCE Pune Scholarship Result 2022 जाहीर करण्यात आला आहे. काल (7 नोव्हेंबर ) दिवशी संध्याकाळी 7 च्या सुमारास 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षांचा अंतरिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा शिष्यवृत्ती परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा अंतरिम निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. MSCE चे अधिकृत संकेतस्थळ mscepune.in आणि mscepuppss.in वर विद्यार्थ्यांना त्यांचे विषयनिहाय गुण पाहता येणार आहेत. यंदा 31 जुलै दिवशी ही शिष्यवृत्तीची परीक्षा पार पडली होती. त्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 20 सप्टेंबरला या परीक्षेची अंंतिम उत्तर तालिका (Final Answer Key) जारी केली होती. त्यामुळे विद्यार्थी, पालकांमध्ये या परीक्षेच्या निकालाची उत्सुकता होती.
कसा पहाल शिष्यवृती परीक्षेचा निकाल ?
- mscepune.in किंवा mscepuppss.in वर क्लिक करा.
- होम पेज वर रिझल्ट लिंक पहा.
- आता नव्या विंडो मध्ये तुमचा 11 अंकी आसन क्रमांक टाका.
- त्यानंतर विषयनिहाय तुम्ही निकाल पाहू शकाल.
दरम्यान या लिंक वर तुम्ही थेट स्कॉलरशीप निकाल पाहू शकाल.
सध्या स्कॉलरशीप परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांची पडताळणी करून घ्यायची असल्यास 17 नोव्हेंबर म्हणजेच अंतरिम निकालानंतर 10 दिवसांचा कालावधी असणार आहे. ऑनलाईन माध्यमातूनच विद्यार्थ्यांना त्यासाठी अर्ज करता येणार आहे. मात्र हा अर्ज शाळांच्या लॉगिन मधून करता येणार आहे. यासाठी प्रत्येक विषयासाठी 50 रूपये शुल्क आकारला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या अर्जावर 30 दिवसांमध्ये निकाल दिला जाईल त्यानंतर अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.