MHT CET Result 2022 Declared: एमएचटी सीईटीचा PCM, PCB ग्रुपचा निकाल cetcell.mahacet.org वर जाहीर; असं पहा स्कोअरकार्ड
विद्यार्थ्यांना त्यांचे गुण cetcell.mahacet.org, mhtcet2022.mahacet.org यावर पाहता येणार आहे.
The State Common Entrance Test Cell Maharashtra कडून घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी, फार्मसी आणि अन्य शाखेच्या प्रवेशासाठीच्या सीईटी परीक्षेचा निकाल अखेर जारी झाला आहे. पीसीएम (PCM) आणि पीसीबी (PCB) अशा दोन्ही ग्रुपचा स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे गुण cetcell.mahacet.org, mhtcet2022.mahacet.org यावर पाहता येणार आहे. सुमारे 4 लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे पुढील प्रवेश या परीक्षेवर अवलंबून आहेत.
विद्यार्थ्यांच्या रॅन्किग मध्ये टाय होऊ नये म्हणून percentile scores हा सात डेसिमल पर्यंत मोजून निकाल लावला जातो. आता निकालानंतर प्रवेश प्रक्रियेची पुढील प्रक्रिया सुरू करून वेळापत्रक जारी केले जाणार आहे. नक्की वाचा: MHT CET 2022 Result: सीईटी निकालामध्ये Percentile Score कसा कॅलक्युलेट केला जातो?
कसा पहाल आज MHT CET 2022 चा निकाल
- सीईटी चा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- होमपेजवर स्कोअर कार्डच्या लिंक वर क्लिक करा.
- तुमचे लॉगिन डिटेल्स (अॅप्लिकेशन नंबर व जन्मतारीख) टाका.
- निकाल आता स्क्रिन वर पाहता येईल.
- हा निकाल डाऊनलोड करण्याची देखील सोय आहे.
PCM ग्रुपचा निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा तर PCB ग्रुपचा निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा
पीसीएम ग्रुपची परीक्षा यंदा 5 ते 11 ऑगस्ट आणि पीसीबी ग्रुपची परीक्षा 12 ऑगस्टला झाली होती. काही ठिकाणी पुन्हा परीक्षेचं आयोजन करण्यात आले होते ती परीक्षा 29 ऑगस्टला झाली होती.
(The above story first appeared on LatestLY on Sep 15, 2022 04:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

