MHT CET 2025 PCM Group Toppers' List: एमएचटी सीईटी पीसीएम निकालामध्ये 22 जणांना 100% गुण; इथे पहा टॉपर्स लिस्ट

पीसीएम ग्रुपच्या या निकालावरून महाराष्ट्रात अभियांत्रिकी आणि फार्मसी प्रवेशाच्या पुढील टप्प्याचा पाया रचला आहे. विद्यार्थी आता एमएचटी सीईटी 2025 counselling आणि choice filling साठी सज्ज होऊ शकतात, जे लवकरच अधिकृत वेबसाइटवर सुरू होईल.

Online Student | Pixabay.com

Maharashtra State Common Entrance Test Cell कडून काल 16 जूनला पीसीएम आणि आज 17 जूनला पीसीबी ग्रुपचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये पीसीएम ( फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथ्स) या ग्रुपमधील विद्यार्थ्यांची टॉपर्स लिस्ट जाहीर केली आहे. महाराष्ट्र सीईटी सेलने दिलेल्या माहितीनुसार, पीसीएम ग्रुप मध्ये 22 जणांना 100% गुण मिळाले आहेत. एकुण 464263 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे त्यापैकी 422663 जणांनी परीक्षा दिली आहे. पीसीएम ग्रुपचा एकूण निकाल 91.04% लागला आहे.  cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाईट वर निकाल पाहता येणार आहे.  नक्की वाचा: MHT CET 2025 PCB Result: एमएचटी सीईटी ग्रुपचा पीसीबी चा निकाल जाहीर; mahacet.org वर असे पहा स्कोअरकार्ड .

एमएचटी सीईटी पीसीएम ग्रुप ची परीक्षा यंदा सीईटी सेल कडून 19 ते 27 एप्रिल दरम्यान घेतली आहे. तर 5 मे दिवशी एक पुन्हा परीक्षा करून घेण्यात आली आहे. टॉपर्सच्या यादी मध्ये महाराष्ट्रातील जिल्ह्यांतील आणि राज्याबाहेरील, नवी दिल्ली आणि कोलकातासह इतरही अनेक राज्यातील विद्यार्थ्यांच्या नावाचा समावेश आहे.

इथे पहा पीसीएम ग्रुपची टॉपर्स लिस्ट

टॉपर्सच्या यादीमध्ये OBC, SC, ST, NT, SBC आणि SEBC सारख्या विविध श्रेणींमध्ये सर्वाधिक गुण मिळवणारे विद्यार्थ्यांची देखील यादी आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून MHT CET PCM ग्रुप ची 2025 ची तपशीलवार टॉपर्स यादी पाहू शकतात.

पीसीएम ग्रुपच्या या निकालावरून महाराष्ट्रात अभियांत्रिकी आणि फार्मसी प्रवेशाच्या पुढील टप्प्याचा पाया रचला आहे. विद्यार्थी आता एमएचटी सीईटी 2025 counselling आणि choice filling साठी सज्ज होऊ शकतात, जे लवकरच अधिकृत वेबसाइटवर सुरू होईल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement