MHT CET 2022 Update: यंदाच्या सीईटी परीक्षांच्या रजिस्ट्रेशन साठी 11 मे पर्यंत मुदतवाढ

दा MHT CET Exams 2022 (MHT-CET 2022, MAH MBA/MMS CET 2022, MAH MCA CET 2022, MAH M-ARC CET 2022 and MAH M-HMCT) या परीक्षा देणार्‍यांसाठी ही मुदतवाढ लागू असणार आहे.

Exam | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (Maharashtra Common Entrance Test Cell) कडून काही दिवसांपूर्वीच MHT CET 2022 परीक्षेसाठी रजिस्ट्रेशनच्या कालमर्यादेमध्ये वाढ करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. आता विद्यार्थी 11 मे पर्यंत परिक्षेसाठी अर्ज करू शकणार आहेत. यामध्ये 5 सीईटी परीक्षांचा समावेश असणार आहे. यंदा MHT CET Exams 2022 (MHT-CET 2022, MAH MBA/MMS CET 2022, MAH MCA CET 2022, MAH M-ARC CET 2022 and MAH M-HMCT) या परीक्षा देणार्‍यांसाठी ही मुदतवाढ लागू असणार आहे.

पोस्ट ग्रॅज्युएट टेक्निकल कोर्स मधील या 5 सीईटी परीक्षांसाठी cetcell.mahacet.org या महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा कक्षांच्या अधिकृत वेबसाईट वर रजिस्ट्रेशन करता येणार आहे. दरम्यान विद्यार्थी, पालकांकडून सातत्याने मुदतवाढ द्यावी यासाठी मागणी करत होते त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे नोटिफिकेशन मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. नक्की वाचा:  MHT CET 2022 Timetable: सीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या सविस्तर .

सीईटी परीक्षेसाठी कसं कराल ऑनलाईन रजिस्ट्रेशन?

यंदा JEE , NEET परीक्षेसोबत सीईटीच्या परीक्षा येत असल्याने सीईटीच्या परीक्षांमध्ये तारखांमध्ये बदल झाला आहे. या परीक्षांचेही सविस्तर वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. PCM ग्रुपची परीक्षा 05 ते 11 ऑगस्ट, 2022 आणि PCB ग्रुपची परीक्षा 12 ते 20 ऑगस्ट, 2022 दरम्यान होणार आहे.