Representational Image (Photo Credits: Pixabay)

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य कडून आज MHT CET or Common Entrance Test 2022 साठी अ‍ॅडमीट कार्ड्स अर्थात हॉल तिकीट जारी करण्यात आली आहेत. विद्यार्थी आपली हॉल तिकीट्स cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाईट वरून डाऊनलोड करू शकतात. MHT CET 2022 Exams यंदा 5 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट दरम्यान घेतली जाणार आहे. यामध्ये एलएलबी (3 वर्ष कोर्स), एलएलबी (5 वर्ष कोर्स) आणि पीसीएम, पीसीबी ग्रुप च्या सीईटी परीक्षा होणार आहेत. MHT CET 2022 PCM ग्रुपची परीक्षा 5-11 ऑगस्ट मध्ये होणार तर पीसीबी ग्रुप ची परीक्षा 12 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान होणार आहे.

MHT CET admit card 2022 कसे कराल डाऊनलोड?

(हे देखील नक्की वाचा: CUET UG Phase II Admit Card 2022: आज 10 वाजल्यापासून अ‍ॅडमिट कार्डस होणार जारी cuet.samarth.ac.in वरून अशी करा डाऊनलोड).

विद्यार्थ्यांना MHT CET 2022 परीक्षा साठी 9 ते 12 च्या शिफ्ट साठी 7.30 वाजता परीक्षा केंद्रावर पोहचणं आवश्यक आहे. तर 2 ते 5 च्या शिफ्टसाठी 12.30 पर्यंत पोहचणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेला जाताना हॉल तिकीट घेऊन जाणं आवश्यक आहे. फक्त पाण्याची बाटली आणि स्टेशनरी घेऊन जाण्याची परवानगी आहे.