Maharashtra SSC Result 2025 Re-evaluation, Answer Sheet Photocopy, Supplementary Exam Dates: महाराष्ट्र बोर्ड दहावीच्या परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्यास गुणपडताळणी, श्रेणी सुधार परीक्षेसाठी कधी पर्यंत कराल अर्ज?
13 मे दिवशी निकाल लागल्यानंतर दहावीचे विद्यार्थी 14 मे ते 28 मे 2025 पर्यंत गुणपडताळणी आणि छायाप्रत साठी ऑनलाईन करू शकतात. ही सेवा सशुल्क आहे.
महाराष्ट्र एसएससी बोर्डाचा अर्थात दहावीचा निकाल (Maharashtra SSC Result) 13 मे 2025 दिवशी जाहीर केला जाणार आहे. दहावीची बोर्ड परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी पहिली बोर्ड परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांना या परीक्षेचं दडपण आणि निकालाची उत्सुकता अधिक असते. यंदा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान पार पडलेल्या परीक्षेचा निकाल Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education कडून बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट जाहीर केला जाणार आहे. दुपारी 1 वाजल्यापासून बोर्डाच्या वेबसाईट वर निकाल पाहता येणार आहे. अधिकृत आणि थर्ड पार्टी वेबसाईट्स मिळून 9 संकेतस्थळांच्या मदतीने त्यांचा निकाल झटपट पाहता येणार आहे. पण या परीक्षेत विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही तर खचून जाण्याची गरज नाही.
दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत अपेक्षित यश मिळाले नाही तर त्यांना शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. विद्यार्थी त्यांच्या उत्तर पत्रिकांची फोटोकॉपी पाहू शकतात. गुणपडताळणीसाठी अर्ज करू शकतात. काही कारणास्तव परीक्षेला पूर्ण तयारीनिशी जाऊ न शकलेल्यांना श्रेणी सुधार परीक्षेचा देखील मार्ग आहे. याच्या माध्यमातून पुन्हा परीक्षा देऊन अधिक मार्क्स मिळवले जाऊ शकतात. मग जाणून घ्या निकालानंतर तुमचे मार्क्स अपेक्षित मार्क्स नसतील तर विविध पर्यायांसाठी राज्य शिक्षण मंडळाकडे कधी पर्यंत अर्ज करण्याची मुभा आहे. नक्की वाचा: Maharashtra Board SSC Result 2025: महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल अवघ्या काही तासांवर; 13 मे दिवशी SMS च्या माध्यमातून कसा बघाल?
दहावीच्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार, गुण पडताळणी साठी अर्ज करण्याची संधी कधी?
13 मे दिवशी निकाल लागल्यानंतर दहावीचे विद्यार्थी 14 मे ते 28 मे 2025 पर्यंत गुणपडताळणी आणि छायाप्रत साठी ऑनलाईन करू शकतात. ही सेवा सशुल्क आहे. त्यामुळे यूपीआय च्या माध्यमातून पैसे भरून त्यासाठी घरबसल्या अर्ज करता येऊ शकतो. पुर्नमूल्यांकनासाठी देखील ऑनलाईन अर्ज करता येतो.
श्रेणी आणि गुणसुधार साठी लगतच्या सलग 3 संधी विद्यार्थ्यांना दिल्या जाणार आहेत. यामध्ये जून-जुलै 25, फेब्रुवारी- मार्च 26 आणि जून जुलै 2026 मध्ये परीक्षा दिली जाऊ शकते. यामध्ये जून जुलै 2025 च्या परीक्षेसाठी 15 मे 2025 पासून विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहेत. यासाठी देखील ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. नक्की वाचा: Maharashtra Board Class 10th Result 2025: महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तुमची गुणपत्रिका DigiLocker वरून अशी करा डाऊनलोड .
दरम्यान 13 मे दिवशी राज्यात लाखो विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाणार आहे. या निकालानंतर राज्यात 11वी प्रवेशाची प्रक्रिया सुरू केली जाईल तर विद्यार्थ्यांना त्यांची मार्क्सशीट शाळेत उपलब्ध करून दिली जाईल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)