IPL Auction 2025 Live

Maharashtra SSC, HSC Supplementary Exam Result 2021: महाराष्ट्र बोर्डाचा 10वी,12वी पुरवणी परीक्षांचा निकाल जाहीर; असे पहा तुमचे मार्क्स

आज निकालानंतर उत्तर पत्रिकेच्या गुणपडताळणीसाठी गुरुवार (21 ऑक्टोबर 2021) ते शनिवार (30 ऑक्टोबर) या कालावधीत तर छायाप्रतीसाठी 21 ऑक्टोबर 2021 ते 9 नोव्हेंबर 2021 या काळात ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

Exam (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून आज यंदाच्या 10वी,12वी पुरवणी परीक्षेचा निकाल (SSC, HSC Supplementary Exam Result) जाहीर करण्यात आला आहे. mahresult.nic.in या बोर्डाच्या संकेतस्थळावर हा निकाल SSC, HSC चे विद्यार्थी ऑनलाईन पाहू शकतात. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापुर अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. राज्य मंडळाने यंदा दहावीची पुरवणी परीक्षा 22 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर मध्ये घेतली. तर बारावीची परीक्षा 16 सप्टेंबर ते 11ऑक्टोबर दरम्यान घेतली. त्यासाठी राज्यातून इयत्ता दहावीच्या 42 हजार 634 विद्यार्थ्यांनी 355 केंद्रांवर, तर बारावीच्या 67 हजार 603 विद्यार्थ्यांनी 317 केंद्रांवर परीक्षा दिली आहे. आज त्यांच्या निकालामध्ये विषयानुसार गुण जाहीर करण्यात आले आहेत. नक्की वाचा: Maharashtra Supplementary Exam Results: इयत्ता 10, 12 वी पुरवणी परीक्षेचा निकाल 20 ऑक्टोबरला होणार जाहीर, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती.

कसा पहाल पुरवणी परीक्षा 2021 चा ऑनलाईन निकाल? 

दरम्यान आज निकाल जाहीर झाल्यानंतर उद्या म्हणजेच 21 ऑक्टोबर पासून दहावी व बारावी पुरवणी परीक्षेला सामोरे गेलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी मिळवलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्र मिळवता येणार आहे. विद्यार्थ्याना स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयाव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयांबाबत माहिती घेता येईल. त्यासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करण्याची सोय उपलब्ध आहे. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी http://verification.mh-ssc.ac.in तर इयत्ता बारावीसाठी http://verification.mh-hsc.ac.in हे संकेतस्थळ आहे. दरम्यान, यासाठी असलेल्या अटी/ शर्ती संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी त्या जाणून घ्यायच्या आहेत.

उत्तर पत्रिकेच्या गुणपडताळणीसाठी गुरुवार (21 ऑक्टोबर 2021) ते शनिवार (30 ऑक्टोबर) या कालावधीत तर छायाप्रतीसाठी 21 ऑक्टोबर 2021 ते 9 नोव्हेंबर 2021 या काळात ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थी अर्ज करु शकतात. ही सेवा सशुल्क असणार आहे.