Maharashtra SSC, HSC Board Exams 2022 Question Banks: यंदा 10वी,12वी च्या विद्यार्थ्यांसाठी maa.ac.in वर Question Banks जारी

दहावी,बारावीच्या विद्यार्थ्यांना यंदा परीक्षेचं स्वरूप समजून घेण्यासाठी, परीक्षेची तयारी करण्यासाठी ही Question Bank मदत करेल असा विश्वास आहे.

Exam Results | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

महाराष्ट्र स्टेट बॉर्ड ऑफ सेकंडरी अ‍ॅन्ड हायर सेकंडरी एज्युकेशन अर्थात MSBSHSE कडून काही दिवसांपूर्वीच यंदा शिक्षण मंडळ 10वी, 12वीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यावर ते ठाम असल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे. या परीक्षांसाठी मंडळाने विशिष्ट गाईडलाईन्स देखील जारी केल्या आहेत. कोविड 19 च्या दहशतीखालीच यंदाही परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांवरील परीक्षेचं दडपण थोडं कमी करण्यासाठी आता बोर्डाने Question Banks जारी केली आहे. SCERT कडून जारी करण्यात आलेली ही Question Banks दहावी,बारावीच्या विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाईट maa.ac.in वर उपलब्ध होणार आहे.

दरम्यान दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी Question Banks ची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत दिली आहे. हे देखील नक्की वाचा:  Maharashtra Board Exams 2022: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना यंदा लेखी परीक्षेसाठी मिळणार वाढीव वेळ .

Maharashtra 10th, 12th Board Exams 2022 ची Question Banks कुठे पहाल?

दहावी,बारावीच्या विद्यार्थ्यांना यंदा परीक्षेचं स्वरूप समजून घेण्यासाठी, परीक्षेची तयारी करण्यासाठी ही Question Bank मदत करेल असा विश्वास आहे.

काही दिवसांपूर्वी राज्यात 10वी,12वी च्या परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात यासाठी आंदोलन झालं होतं. पण शिक्षणमंडळाने विद्यार्थीसंख्या पहता तितकी तांत्रिक सुविधा उपलब्ध नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे यंदा परीक्षा ऑफलाईनच घेतल्या जाणार आहेत. आता बारावीची परीक्षा 4 मार्च 2022 तर दहावीची परीक्षा 15 मार्च 2022 पासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी तोंडी परीक्षा आणि प्रॅक्टिकल्स होणार आहेत.