Maharashtra Board SSC Exam 2024: महाराष्ट्र बोर्ड ची 10वी ची परीक्षा आजपासून सुरू; लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी!
या परीक्षेला सामोरं जाण्यासाठी विद्यार्थ्यांना काही गोष्टी, नियमांचं पालन करावं लागणार आहे.
शालेय जीवनामधील दहावीची बोर्ड ( SSC Board Exam) परीक्षा हा महत्त्वाचा टप्पा आहे. Maharashtra Board of Secondary and Higher Secondary Education कडून आज 1 मार्च पासून दहावीच्या परीक्षेला सुरूवात होत आहे. राज्यभरातील 9 मंडळांमध्ये आजपासून सुरू होत असलेली ही परीक्षा सकाळ आणि दुपारच्या सत्रात होणार आहे. सकाळी 11 ते 2 आणि दुपारी 3 ते 6 या वेळेमध्ये हीपरीक्षा होणार आहे. दहावीच्या परीक्षेची सुरूवात आज पहिली भाषा परीक्षेने होणार आहे. त्यामध्ये मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम, सिंधी, बेंगाली आणि पंजाबी भाषेचा समावेश आहे. ही परीक्षा पहिल्या सत्रात होईल तर दुसर्या सत्रामध्ये जर्मन, फेंच भाषेचा समावेश आहे.
दहावीची परीक्षा आज 1 मार्च पासून 26 मार्च पर्यंत चालणार आहे. या परीक्षेला सामोरं जाण्यासाठी विद्यार्थ्यांना काही गोष्टी, नियमांचं पालन करावं लागणार आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नियम
- परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान तासभर आधी परीक्षा केंद्रावर पोहचणं आवश्यक आहे. हॉल तिकीटावर परीक्षा केंद्रावर पोहचण्याच्या वेळेबद्दल माहिती दिलेली आहे.
- परीक्षार्थ्याला प्रत्येक विषयाच्या परीक्षेला जाताना सोबत हॉल तिकीट ठेवणं आवश्यक आहे. हॉल तिकीटाशिवाय विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही.
- परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांना कोणतीही इलेक्टिक उपकरणं जसं की मोबाईल फोन, डिजिटल कॅल्युलेटर, स्मार्टवॉच, इअरफोन सोबत घेऊ जाता येणार नाही.
- विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळेमध्ये अधिकची दहा मिनिटं ही परीक्षा वेळे नंतरची वाढवून देण्यात आली आहे. सुरूवातीला अधिकची दहा मिनिटं मिळणार नाहीत. त्यामुळे पेपर वाचण्यासाठी पूर्वी दिला जाणारा 10 मिनिटांचा वेळ आता बंद झाला आहे.
- दहावीच्या परीक्षेत पेपर फूटी, कॉपी यासारखे प्रकार रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. यामध्ये कुणी दोषी आढळले तर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
राज्यात एकूण 9 विभाग मिळून 8.59 लाख मुलं आणि 7.49 लाख मुली परीक्षेला सामोरी जाणार आहेत. मुंबई विभागामध्ये 1.39 लाख दहावीचे विद्यार्थी आहेत. ठाण्यात 1.21, पालघर मध्ये 65389 आणि रायगड मध्ये 37,516 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणीकृत झाले आहेत