Maharashtra Board HSC Math's Question Paper Leak: बारावी गणित पेपरफुटीप्रकरणाचा तपास ‘SIT’ कडे
अमरावती विभागाच्या सचिवांनी पत्रक काढून सिंदखेडराजा तालुक्यातील केंद्र क्रमांक 601 602 6060 609 या परीक्षा केंद्रावरील केंद्र संचालकात तात्काळ बदल करून इतर शिक्षकांची नियुक्ती करावी व संबंधितांना आदेश निर्गमित करण्याचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्रात 10वी, 12वी च्या बोर्ड परीक्षा सुरू आहेत. राज्यात काही ठिकाणी कॉपिमुक्त परीक्षा अभियानाचे तीन तेरा उडाल्याचं चित्र आहे. मागील आठवड्यात बारावीचा गणिताचा पेपर (HSC Math's Question Paper) सोशल मीडीयात लीक झाल्याचं पहायला मिळालं आहेत. याप्रकरणी काही शिक्षक आणि विद्यार्थांवर कारवाई केल्यानंतर या पेपरफूटी प्रकरणाचा पुढील तपास आता SIT कडे देण्यात आला आहे. यामध्ये 7 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस ताब्यात असलेल्या 2 शिक्षकांना सध्या 10 मार्च पर्यंत पोलिस कोठडी देखील ठोठावण्यात आली आहे.
महाराष्ट्रात काही ठिकाणी सामुहिक कॉपीचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे यंदा कोविड संकटानंतर पुन्हा पूर्वीप्रमाणे परीक्षा घेऊन ती सुरळीत पार पाडण्याचं मोठं आवाहन बोर्डासमोर आहे. अशात आता 12वीच्या गणिताच्या पेपरचा काही भाग सोशल मीडीयात व्हॉट्सअॅप वर वायरल झाल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांची क्राईम ब्रांच या पेपरफूटी प्रकरणाच्या मागे लागलं होतं. मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी एसआयटी ची स्थापना करण्यात आली आहे. नक्की वाचा: Maharashtra Board HSC Maths Question Paper Leak: 12वीचा गणिताचा पेपर फूटल्याप्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल, मुंबईमधील 3 विद्यार्थ्यांचा समावेश; Crime Branch कडे तपास .
अमरावती विभागाच्या सचिवांनी पत्रक काढून सिंदखेडराजा तालुक्यातील केंद्र क्रमांक 601 602 6060 609 या परीक्षा केंद्रावरील केंद्र संचालकात तात्काळ बदल करून इतर शिक्षकांची नियुक्ती करावी व संबंधितांना आदेश निर्गमित करण्याचे आदेश दिले आहेत. HSC Exams 2023: विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली नाही व्हायरल झालेली प्रश्नपत्रिका; इयत्ता 12 वीच्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही, शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरण.
बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेडराजामध्ये बारावीच्या गणिताचा पेपर फुटल्याने शिक्षण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभं राहिले आहे. आता शिक्षण विभागाकडूनही पेपरफूटीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अजून कठोर पावलं उचलली जातील असे सांगण्यात आले आहे.