MAH MBA CET 2025 Results Announced: एमबीए सीईटी चा निकाल cetcell.mahacet.org वर जाहीर; 7 जणांना 100% गुण
निकाल जाहीर झाल्यानंतर, एमएएच एमबीए सीईटी 2025 सेंट्रलाइज्ड अॅडमिशन प्रोसेस (CAP) लवकरच सुरू होईल. सविस्तर काऊन्सिलिंग वेळापत्रक आणि प्रवेश मार्गदर्शक नियमावली लवकरच अधिकृत वेबसाइटवर जाहीर केली जाईल.
Maharashtra State Common Entrance Test (CET) Cell कडून यंदाचा MAH MBA CET 2025 निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. सीईटी सेलची अधिकृत वेबसाईट cetcell.mahacet.org वर विद्यार्थ्यांना स्कोअरकार्ड पाहता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना रजिस्टर इमेल आयडी आणि पासवर्ड च्या माध्यमातून रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. त्यानंतर निकाल पाहता येईल.
यंदाच्या वर्षी 1,57,281 विद्यार्थी रजिस्टर झाले होते. त्यापैकी 1,29,131 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. MAH MBA CET 2025 मध्ये यंदा राज्यात सात जणांना 100% गुण मिळाले आहेत. सीईटी सेलने हर्षिता पांडे, प्रथम सिंग, प्रतीक म्हात्रे, मुजैद खान, आर्ची बिंदल, लक्षिता चंडालिया आणि शाश्वी शाह हे सात जण टॉपर असल्याचे जाहीर केले आहे. सीईटीने अधिक तपशील दिलेला नाही. 1,2,3 एप्रिल 2025 झालेल्या परीक्षेचा निकाल आता 28 मे 2025 दिवशी जाहीर झाला आहे.
सहा सत्रांमध्ये झालेल्या परीक्षेत 28 चुकीचे प्रश्न होते. त्यापैकी 10 प्रश्न 2 एप्रिलच्या सकाळच्या सत्रातील होते आणि नऊ प्रश्न 3 एप्रिलच्या दुपारच्या सत्रातील होते. या प्रश्नांचे गुण विद्यार्थ्यांना देण्यात आले आहेत. नक्की वाचा: MHT CET Result 2025: एमएचटी सीईटी पीसीएम, पीसीबी ग्रुपचे निकाल cetcell.mahacet.org वर लवकरच होणार जाहीर; जाणून घ्या कसं पहाल स्कोअरकार्ड.
कसा पहाल MAH MBA CET 2025 निकाल
- cetcell.mahacet.org ला भेट द्या.
- स्कोअरकार्ड डाऊनलोड लिंक वर क्लिक करा.
- तुमचे login credentials टाका.
- आता तुमचं स्कोअरकार्ड स्क्रिनवर दिसेल ते डाऊनलोड करा.
निकाल जाहीर झाल्यानंतर, एमएएच एमबीए सीईटी 2025 सेंट्रलाइज्ड अॅडमिशन प्रोसेस (CAP) लवकरच सुरू होईल. सविस्तर काऊन्सिलिंग वेळापत्रक आणि प्रवेश मार्गदर्शक नियमावली लवकरच अधिकृत वेबसाइटवर जाहीर केली जाईल.
(The above story first appeared on LatestLY on Aug 14, 1742 05:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

