MHT CET Result 2025: एमएचटी सीईटी पीसीएम, पीसीबी ग्रुपचे निकाल cetcell.mahacet.org वर लवकरच होणार जाहीर; जाणून घ्या कसं पहाल स्कोअरकार्ड
निकालात विद्यार्थ्यांना एकूण percentile सह भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित किंवा जीवशास्त्रातील विषयवार गुणांचा उल्लेख असेल. याव्यतिरिक्त, परीक्षा अधिकारी निकालांसह MHT CET 2025 च्या टॉपर्सची यादी प्रसिद्ध करतील.
Maharashtra Common Entrance Test (MHT CET) 2025 चा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पीसीएम आणि पीसीबी या दोन्ही ग्रुपचे निकाल हाती येण्याचा अंदाज आहे. अधिकृत वेबसाईट cetcell.mahacet.org वर विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल पाहता येणार आहेत. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांकडे रजिस्टर इमेल आयडी आणि पासवर्ड च्या माध्यामातून लॉगिन करावे लागणार आहे. आता विद्यार्थ्यांना त्यांचे स्कोअरकार्ड डाऊनलोड करता येणार आहे.
निकालात विद्यार्थ्यांना एकूण percentile सह भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित किंवा जीवशास्त्रातील विषयवार गुणांचा उल्लेख असेल. याव्यतिरिक्त, परीक्षा अधिकारी निकालांसह MHT CET 2025 च्या टॉपर्सची यादी प्रसिद्ध करतील. MHT CET 2025 PCM, PCB निकालाची उत्सुकता; पहा Percentile च्या फॉर्म्युला काय? कसा लावला जातो निकाल.
MHT CET 2025 Result कसा तपासाल?
- MHT CET result पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट cetcell.mahacet.org ला भेट द्या.
- “MHT CET 2025 Results." वर क्लिक करा.
- आता तुमचा अॅप्लिकेशन नंबर आणि जन्मतारीख टाका.
- कॅप्चा कोड टाका आणि लॉगिन बटण वर क्लिक करा.
- MHT CET 2025 result तुमच्या स्क्रिन वर दिसणार आहे.
- निकालावरील सारे तपशील नीट पहा. आता तुमचं स्कोअरकार्ड डाऊन करू शकता.
पीसीएम गटासाठी एमएचटी सीईटी 2025 परीक्षा 19 एप्रिल ते 27 एप्रिल दरम्यान झाली नंतर पुन्हा 5 मे दिवशी आयोजित करण्यात आली. पीसीबी गट परीक्षा 9 एप्रिल ते 17 एप्रिल दरम्यान झाली आहे. आता या परीक्षेच्या निकालाची उत्सुकता आहे.
महाराष्ट्र कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (MHT CET) ही राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा आहे जी महाराष्ट्र राज्य कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेल द्वारे घेतली जाते. ही परीक्षा दरवर्षी महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांमध्ये दिल्या जाणाऱ्या अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, फार्मसी आणि कृषी विषयातील पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाते.
(The above story first appeared on LatestLY on May 29, 2025 01:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

