Maharashtra MBA CET 2019 Hall Ticket: अधिकृत संकेतस्थळ @dtemaharashtra.gov.in वर महाराष्ट्र एमबीए सीईटीचे हॉल तिकीट उपलब्ध
Representational Image (Photo Credits: Pixabay

MAH MBA CET 2019 Hall Ticket: महाराष्ट्र मास्टर इन बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (MAH MBA/MMS CET 2019) प्रवेश पत्र (Admit Card) प्रसिद्ध करण्यात आली आहेत. महाराष्ट्र मास्टर इन बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन कॉमन एन्ट्रन्स टेस्ट 2019 देणारे सर्व परीक्षार्थी विभागाच्या अधिकृत संकेतस्थलावर जाऊन आपले प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकतात. महाराष्ट्र मास्टर इन बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन कॉमन एन्ट्रन्स टेस्ट 2019 मध्ये उत्तर्ण होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्रचातील बिझनेस स्कूलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

महाराष्ट्र मास्टर इन बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन कॉमन एन्ट्रन्स टेस्ट 2019 चे हॉल तिकीट कसे मिळवाल (MAH-MBA/MMS-CET 2019 Hall Ticket)

  • प्रथम अधिकृत संकेतस्थळाला (dtemaharashtra.gov.in) भेट द्या.
  • त्यानंतर MBA entrance exam लिंकवर जा.
  • लिंकवर क्लिक केल्यानंतर आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्मतारीख एंटर करा.
  • आता आपल्यासमोर आपले हॉल तिकीट उपलब्ध असेल.
  • हे हॉल तिकीट डाऊनलोड करा आणि सोबत ठेवा.

(हेही वाचा, Maharashtra SSC Exam 2019: शुभेच्छा! इयत्ता दहावी परीक्षेला आजपासून सुरुवात, राज्यभरातील तब्बल १७ लाख ८१३ परीक्षार्थींची लागणार कसोटी)

महाराष्ट्र मास्टर इन बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन कॉमन एन्ट्रन्स टेस्ट 2019 चे आयोजन पूर्ण राज्यात 9 मार्च रोजी आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र मास्टर इन बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन कॉमन एन्ट्रन्स टेस्ट 2019 (MAH MBA/MMS CET 2019) मध्ये एन्ट्रन्स परिक्षा राज्यभरातून हजारो विद्यार्थी देणार आहेत. महाराष्ट्र मास्टर इन बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन कॉमन एन्ट्रन्स टेस्ट 2019 (MAH MBA/MMS CET 2019) परिक्षा संबंधी सर्व माहिती dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे.