Maharashtra SSC Exam 2019: शुभेच्छा! इयत्ता दहावी परीक्षेला आजपासून सुरुवात, राज्यभरातील तब्बल १७ लाख ८१३ परीक्षार्थींची लागणार कसोटी

सर्व परीक्षार्थींना परीक्षा हॉलमध्ये परीक्षा सुरु होण्यापूर्वी आर्धा तास आगोदर उपस्थित राहणे आवश्यक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी परीक्षार्थींच्या संख्येत काहीशी घट झाली आहे गेल्या वर्षी या परीक्षेसाठी १७ लाख ५१ हजार ३५३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. मात्र, यंदाच्या वर्षी या परीक्षेसाठी नोंदीणी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रामण ५० हजार ५४० ने घटले आहे.

Maharashtra SSC Exam 2019: शुभेच्छा! इयत्ता दहावी परीक्षेला आजपासून सुरुवात, राज्यभरातील तब्बल १७ लाख ८१३ परीक्षार्थींची लागणार कसोटी
Maharashtra SSC Exam 2019 start from today Friday, March 1 | (Photo Credits- File photo for representation only)

Maharashtra SSC Exam 2019 start from today, March 1, 2019: गेले वर्षभर किंवा त्याही आगोदरपासून वेळेचे काटेकोर नियोजन करुन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची खरी कसोटी आजपासून लागणार आहे. आज (शुक्रवार, 1 मार्च 2019) सकाळी 11 वाजलेपासून इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा सुरु होत आहे. राज्यभरातून तब्बल १७ लाख ८१३ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. ४ हजार ८७४ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे. परीक्षेदेरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचीत प्रकार किंवा कॉपीसारखा गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथके आणि इतर यंत्रणा कार्यरत आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थी, पालक आणि शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सर्व परीक्षार्थींना लेटेस्टली मराठीकडून खूप खूप शुभेच्छा.

इयत्ता दहावीची परीक्षा ही बोर्ड परीक्षा म्हणून ओळखली जाते. ही परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाते. यंदाच्या वर्षीही पुणे,नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा सालाबादप्रमाणेच घेतली जात आहे. जे विद्यार्थी जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षेला बसले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा म्हणजे शेवटची संधी ठरणार आहे. तर, नव्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची या अभ्यासक्रमानुसार घेतली जाणारी ही पहिलीच परीक्षा आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ठरवून दिलेले नियम आणि निकषांनुसार ही परीक्षा वेळेत सुरु होईल आणि वेळे पार पडेल. राज्य मंडळ अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, निष्पक्ष आणि कोणत्याही गैरप्रकाराशिवाय ही परीक्षा योग्य पद्धतीने पार पडण्यासाठी मंडळाने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली आहे. कॉपीसारखे गैरप्रकार टाळण्यासाठी शिक्षण मंडळाची भरारी पथके परीक्षा केंद्रांवर नजर ठेऊन असतील. परीक्षेची सुरुवात मराठी विषयापासून सुरु होईल. सकाळी (शुक्रवार, 1 मार्च) आकरा वाजता ठरलेल्या वेळेनुसार परीक्षा सुरु होईल. (हेही वाचा, इयत्ता दहावी परीक्षेला 1 मार्चपासून सुरुवात, कॉपीचे प्रकार टाळण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक)

दरम्यान, दरम्यान, सर्व परीक्षार्थींना परीक्षा हॉलमध्ये परीक्षा सुरु होण्यापूर्वी आर्धा तास आगोदर उपस्थित राहणे आवश्यक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी परीक्षार्थींच्या संख्येत काहीशी घट झाली आहे गेल्या वर्षी या परीक्षेसाठी १७ लाख ५१ हजार ३५३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. मात्र, यंदाच्या वर्षी या परीक्षेसाठी नोंदीणी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रामण ५० हजार ५४० ने घटले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Mar 01, 2019 08:45 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).