MAH LLB 5-Year CET Admit Card 2021: एमएचटी सीईटी एलएलबी अॅडमिट कार्ड जारी; cetcell.mahacet.org वरून असं करा डाऊनलोड
परीक्षेला जाताना उमेदवारांना सीईटी अॅडमीट कार्ड आणि व्हॅलिड आयडी प्रुफ घेऊन परीक्षा केंद्रामध्ये पोहचावं लागणार आहे.
स्टेट कॉमन एंटरन्स टेस्ट सेल महाराष्ट्र (State Common Entrance Test Cell) कडून MAH LLB 5-Year CET Admit Card 2021 जारी करण्यात आली आहेत. सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर अॅडमीट कार्ड जारी करण्यात आले आहेत. ज्यांनी एमएएच सीईटी 5 वर्षांच्या एलएलबी कोर्ससाठी अर्ज केला आहे त्यांना अॅडमीट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी cetcell.mahacet.org याला भेट द्यावी लागणार आहे. ही परीक्षा यंदा 8 ऑक्टोबरला होणार आहे.
यंदाची MAH LLB 3 year course exam ची अॅडमीट कार्ड अधिकृत संकेतस्थळावर यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली आहेत. MAH LLB CET 2021 5 year course साठी यंदा 28 जून 2021 पासून रजिस्ट्रेशन सुरू करण्यात आले आहे तर 2 ऑगस्ट 2021 ला पुन्हा सीईटी अॅप्लिकेशन सुरू करण्यात आली होती.
MAH 5 years LLB CET admit card कसं डाऊनलोड कराल?
- अधिकृत वेबसाईट cetcell.mahacet.org ला भेट द्या.
- होमपेजवर "MAH -LLB-5Yrs-CET 2021"वर क्लिक करा.
- स्क्रिन वर नवं पेज ओपन होईल.
- तुमचे क्रेडेंशिअल टाका.
- MHT CET LLB admit cards 2021तुम्हांला स्क्रिनवर पाहता येणार आहे.
- आता अॅडमीट कार्ड सेव्ह करा आणि डाऊनलोड करा.
नक्की वाचा: UGC NET December 2020, June 2021 परीक्षा तारखांमध्ये बदल; इथे पहा नवं वेळापत्रक .
परीक्षेला जाताना उमेदवारांना सीईटी अॅडमीट कार्ड आणि व्हॅलिड आयडी प्रुफ घेऊन परीक्षा केंद्रामध्ये पोहचावं लागणार आहे. MAH LLB CET 2021 परीक्षा 150 गुणांची असेल. उमेदवारांना जनरल नॉलेज, करंट अफेअर, लीगल अॅप्टिट्युड आणि लीगल रिझनिंग आणि इंग्लिश या विषयांचे प्रश्न विचारले जाणार आहेत. इंग्रजी आणि मराठी मध्ये ही परीक्षा होणार असून यामध्ये निगेटीव्ह मार्किंग सिस्टिम नसेल.