JEE Main 2021 Re-Exam Date: महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागात आता जेईई मेन ची परीक्षा 3, 4 ऑगस्टला; 29 जुलै पासून डाऊनलोड करा Admit Card

यासाठी तुम्हांला jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

Representational Image. (Photo Credits: PTI)

द नॅशनल टेस्टिंग एजंसी (NTA) कडून महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातील रद्द झालेल्या जेईई मेन 2021 परीक्षेच्या नव्या तारखा (JEE Main 2021 Re-Exam Date) जाहीर करण्यात आल्या आहेत. एनटीए च्या नव्या नोटिफिकेशन नुसार, जेईई मेन 2021 सेशन 3 ची परीक्षा आता 3 आणि 4 ऑगस्टला होणार आहेत. दरम्यान यापूर्वी ही परीक्षा 25 जुलै आणि 27 जुलै दिवशी होणार होती. पण मुसळधार पाऊस आणि पूरामुळे ती रद्द करण्यात आली होती. नक्की वाचा: JEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती.

जेईई मेन सेशन 3 ची ही पुर्नपरीक्षा केवळ कोल्हापूर, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सांगली आणि सातारा भागात होणार आहे. 25 जुलै आणि 27 जुलैला जे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकलेले नाहीत त्यांच्यासाठी ही परीक्षा असेल.

JEE Main 2021 Re-exam वेळापत्रक

जेईई मेन परीक्षा - 3 आणि 4 ऑगस्ट

अ‍ॅडमिट कार्ड कधी - 29 जुलै पासून

दरम्यान 3 आणि 4 ऑगस्टला होणार्‍या या परीक्षेचं अ‍ॅडमीट कार्ड 29 जुलैपासून डाऊनलोड करता येणार आहे. यासाठी तुम्हांला jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

JEE Main 2021 परीक्षेसाठी कसं डाऊनलोड कराल अ‍ॅडमीट कार्ड

NTA कडून JEE Main 2021 session 3 परीक्षा 20,22,25,27 जुलैला झाल्या आहेत. अद्याप एनटीए त्याची आन्सर की दिलेली नाही. दरम्यान JEE Main 2021 4th attempt साठी तारखा जाहीर झाल्या आहेत. त्या परीक्षा 26,27,31 ऑगस्ट आणि 1,2 सप्टेंबरला होणार आहेत.