JEE Main 2021: जेईई मेन परीक्षेच्या एप्रिल, मे सेशन साठी jeemain.nta.nic.in वर Registration सुरु; 4 एप्रिल पूर्वी करा अर्ज
तर मे महिन्यातील परीक्षा 24 ते 28 मे दरम्यान होणार आहे.
जॉईंट एंटरन्स एक्झामिनेशन अर्थात जेईई मेन 2021 (JEE Main) या परीक्षेच्या एप्रिल (April) आणि मे (May) सत्रातील रजिस्ट्रेशन विंडो आता खुली करण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) कडून त्याबाबत नोटिफिकेशन जारी करण्यात आली आहे. रजिस्ट्रेशनसाठी आता विद्यर्थ्यांना jeemain.nta.nic.in ला भेट द्यावी लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी सामोरं जायचं आहे पण अद्याप फॉर्म भरलेला नाही अशांसाठी आता एप्रिल आणि मे सत्रात परीक्षा देण्यासाठी अजूनही संधी आहे. दरम्यान ज्यांनी आधीच रजिस्ट्रेशन केले आहे पण आता नाव मागे घ्यायचं असल्यास त्यांनाही या वेळेस ते बदल करण्याची सोय आहे. दरम्यान ही विंडो 4 एप्रिल 2021 पर्यंतच खुली राहणार आहे. JEE Main Result 2021: जेईई मेन परीक्षा रिजल्ट जाहीर; जाणून घ्या कुठे, कसा पाहाल?
JEE Main 2021 April, May सत्रासाठी महत्त्वाच्या सूचना
- एप्रिल महिन्यात जेईई मेन 2021 ची परीक्षा एप्रिल 27,28,29 आणि 30 दिवशी होणार आहे. तर मे महिन्यातील परीक्षा 24 ते 28 मे दरम्यान होणार आहे.
- मे आणि एप्रिल 2021 सत्रातील परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना 25 मार्च ते 4 एप्रिल पर्यंतचा कालावधी आहे.
- एप्रिल महिन्यातील जेईई परीक्षेत Paper 2 अर्थात B. Architecture and/or B. Planning चा पेपर घेतला जाणार नाही त्यासाठी विद्यार्थ्यांना मे महिन्यासाठीच अर्ज करावा लागणार आहे.
- विद्यार्थ्यांना या सत्रांसाठी शुल्क भरण्यासाठी 5 एप्रिल 2021 पर्यंतचा वेळ आहे.
(नक्की वाचा: SSC, HSC Board Exams 2021 देणार्या विद्यार्थ्यांनाही परिक्षेपूर्वी कोरोनाची लस देण्याची शिवसेनेची लोकसभेत मागणी) .
दरम्यान यंदा फेब्रुवारी आणि मार्च सत्रात झालेल्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. जेईई मेन नंतर विद्यार्थ्यांना जेईई अॅडव्हान्स परीक्षेला 3 जुलै 2021 ला सामो रं जायचं आहे. त्यामुळे अजूनही जेईई मेन परीक्षेबाबत निर्णय न घेतलेल्यांना ही परिक्षा देण्यासाठी अजून 2 संधी उपलब्ध आहेत.