JEE Main 2021 Admit Card February Session: यंदा जेईई मेन परीक्षा फेब्रुवारी सत्रात देणार्‍यांची अ‍ॅडमीट कार्ड्स जारी; jeemain.nta.nic.in वरून करा डाऊनलोड!

यातील पहिला टप्पा 23-26 फेब्रुवारी 2021, दुसरा टप्पा 15 ते 18 मार्च 2021, तिसरा टप्पा 27 ते 30 एप्रिल 2021 आणि चौथा टप्पा 24 ते 28 मे 2021 असा आहे.

Online Student| Photo Credits: Pixabay.com

नॅशनल टेस्टिंग एजंसी (NTA) कडून यंदाच्या जॉईंट एंटरन्स एक्झामिनेशन अर्थात जेईई मेन्स 2021 फेब्रुवारी सेशनच्या परीक्षांसाठी अ‍ॅडमिट कार्ड्स (JEE Main 2021 Admit Card February Session) जारी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेची ही अ‍ॅडमीट कार्ड्स अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येणार आहेत. त्यामुळे यंदा जे जेईई मेन्स परीक्षा देणार आहेत त्यांना jeemain.nta.nic.in वरून अ‍ॅडमिड कार्ड्स ऑनलाईन डाऊनलोड करता येतील.

एनटीए कडून यंदा जेईई मेन 2021 परीक्षा 4 टप्प्यांमध्ये आयोजित करण्यात आली आहे. यातील पहिला टप्पा 23-26 फेब्रुवारी 2021, दुसरा टप्पा 15 ते 18 मार्च 2021, तिसरा टप्पा 27 ते 30 एप्रिल 2021 आणि चौथा टप्पा 24 ते 28 मे 2021 असा आहे. यंदा जेईई परीक्षा हिंदी, गुजराती, इंग्लिश प्रमाणेच मराठी, मल्याळम, तेलगू, कन्नड, बंगाली, आसामी,ओडिया पंजाबी, उर्दू मध्येही देता येणार आहे.

कसं डाऊनलोड कराल जेईई मेन 2021 चं अ‍ॅडमीट कार्ड