JEE Exam: आता एका वर्षात 4 वेळा होणार जेईई ची परीक्षा
JEE Exam: केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जेईईची परीक्षा आता एका वर्षात चार वेळा आयोजित केली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ देण्याकरिता मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. शिक्षण मंत्रालयाच्या या निर्णयामुळे विद्यार्थी आता परीक्षा देण्यास अधिक सक्षम होणार आहेत. जेईईची परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना यापूर्वी पेक्षा अधिक ऑप्शन उपलब्ध असणार आहेत. जेईई परीक्षेच्या आयोजनाबद्दल माहिती देत केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी असे म्हटले की, जेईई (मुख्य) परीक्षा वर्ष 2021 च्या संपूर्ण वर्षात चार वेळा आयोजिक केली जाणार आहे. याची सुरुवात फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस होणार आहे. त्यानंतर मार्च, एप्रिल आणि मे 2021 मध्ये याचे आयोजन 3-4 दिवसांसाठी केले जाणार आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने आणखी जेईई परीक्षेसाठी नवीन वेळापत्रक जाहीर केले असताना या परीक्षांचा अभ्यासक्रमही सामायिक करण्यात आला आहे. जेईई परीक्षांच्या अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ होऊ नये, असा प्रयत्न शिक्षण मंत्रालयाकडून करण्यात आला आहे.(ME आणि MTech Courses च्या MHT CET Counselling 2020 ला 11 डिसेंबर पासून होणार सुरूवात; cetcell.mahacet.org वर करा ऑनलाईन अर्ज)
जेईईच्या अभ्यासक्रमासंदर्भातील तथ्यांबद्दल केंद्रीय शिक्षण मंत्र्यानी विस्तारीत स्वरुपात म्हटले की, जेईई (मुख्यध 2021 परीक्षा ही गेल्या वर्षातील अभ्यासक्रमासारखीच असणार आहे. मात्र अभ्यासक्रमाचा ताण कमी करण्यासाठी जईई (मुख्य) 2021 साठी प्रश्नपत्रिकेत 90 प्रश्न (भौतिक, रसायन आणि गणित मधील प्रत्येकी 30 प्रश्न) असणार आहेत. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना 75 प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत.(RRB Exams 2020: 15 डिसेंबरपासून सुरु होणार आरआरबी परीक्षा 2020; यंदा पोस्टाद्वारे मिळणार नाही Call Letters, जाणून घ्या RRB NTPC, Group D आणि इतर रेल्वे परीक्षांबद्दल महत्वाच्या गोष्टी)
जेईई परीक्षेव्यतिरिक्त केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या द्वारे नीट परीक्षा आणि त्याच्या अभ्यासक्रमांबद्दल सुद्धा माहिती दिली आहे. देशभरात नीट परीक्षा मेडिकल अभ्यासक्रमासाठी आयोजित केली जाते. या परीक्षेत शिक्षण मंत्रालयासह केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची ही महत्वाची भुमिका असते. रमेश पोखरियाल निशंक यांनी पुढे असे ही म्हटले की, पुढील वर्षात 2021 मध्ये नीट परीक्षेसंबंधित कोणताही निर्णय आरोग्य आणि सामाजिक कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय चिकित्सा आयोगसोबत चर्चा केल्यानंतर घेतला जाणार आहे.