JEE Advanced 2020 Results Declared: जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा निकाल jeeadv.ac.in वर जाहीर; इथे पहा स्कोअर कार्ड, All India Rankings

आज या परीक्षेचा अंतिम निकाल अधिकृ त संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.

Result | Representational Image | (Photo Credits: PTI)

JEE Advanced 2020 Scorecard, AIR:   भारत देशातील 23 प्रतिष्ठीत आयआयटीमध्ये (IIT) प्रवेश घेण्यासाठी उत्सुक असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा (JEE Advanced 2020)  महत्त्वाची असते. आज या परीक्षेचा JEE Advanced 2020 Result जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान jeeadv.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर तो जाहीर करण्यात आला आला आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या स्कोअर कार्ड सोबतच आज All India Rankings (AIR) म्हणजेच देशातील त्यांचं रॅंकिंग देखील पाहता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना जेईई अ‍ॅडव्हान्सच्या अधिकृत संकेतस्थळावर credentials टाकून निकाल पाहता येणार आहे. त्यासोबतच रॅंकिंग पाहून पुढील प्रवेशाची प्रक्रिया सुरू करता येणार आहे.पुण्याचा Chirag Falor हा देशात प्रथम आला आहे. एकूण  43,204 जण पात्र ठरले असून यामध्ये 6,707 मुलींचा समावेश आहे.

यंदा JEE Advanced 2020 ची परीक्षा कोरोनाच्या सावटाखाली 27 सप्टेंबर 2020 दिवशी 222 शहरांमध्ये यंदा 1001 परीक्षा केंद्रांवर जेईई अ‍ॅडव्हांसची पार पडली आहे. आज या परीक्षेचा अंतिम निकाल अधिकृ त संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.

(JEE) Advanced 2020 चा निकाल ऑनलाईन कसा पहाल?

इथे पहा JEE Advanced 2020  निकालाची डिरेक्ट लिंक.

JEE Mains Results 2020 च्या नंतर सुमारे अडीच लाख विद्यार्थी जेईई अ‍ॅडव्हान्ससाठी पात्र असतात मात्र यंदा(JEE) Advanced 2020 साठी केवळ 1 लाख 60 हजार विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते. JEE Advanced 2020 marksheet मध्ये विद्यार्थ्याचे मॅथ्स (गणित), फिजिक्स (भौतिकशास्त्र) आणि केमेस्ट्री (रसायनशास्त्र) या तिन्ही विषयातील मार्कांचे अ‍ॅग्रिगेट काढून निकाल बनवला जातो.दरम्यान जेईई अ‍ॅडव्हांस पेपर 1 आणि 2 या दोन्ही परीक्षा देणार्‍यांचेच अ‍ॅग्रिगेट मार्क्स काढून रॅकिंग जाहीर केले जाते.

दरम्यान आज निकाल पाहिल्यानंतर पात्र विद्यार्थी Joint Seat Allocation Authority (JoSAA) 2020 मध्ये रजिस्ट्रेशन करू शकतात. त्यांच्या पसंतीच्या शाखेची निवड करत त्यांना पात्र  असलेल्या IITs मध्ये प्रवेश प्रक्रिया पुढे सुरू केली  जाणार आहे.