Jamia Admission 2021-22: जामिया 26 जुलैपासून यूजी, पीजी, बीटेक आणि इतर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेणार

या परीक्षा 26 जुलै ते 28 ऑगस्ट 2021 दरम्यान घेण्यात येतील.

Exam | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Jamia Admission 2021-22: नवी दिल्लीतील सेंट्रल युनिव्हर्सिटी जामिया मिलिया इस्लामियाने (जेएमआय) शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील विविध पदवी, पदव्युत्तर, बीटेक, बी. आर्किटेक्चर, डिप्लोमा, पदविका आणि पीजी डिप्लोमा अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठी ई-प्रॉस्पेक्टस जारी केला आहे. ई-प्रॉस्पेक्टस 2021-22 सोमवार, 17 मे 2021 रोजी विद्यापीठाने अधिकृतपणे जाहीर केला. जेएमएआयने जारी केलेल्या प्रसिद्धीनुसार, यंदा 8 नवीन अभ्यासक्रम आणि 4 नवीन विभाग सुरू करण्यात आले असून 134 अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा 26 जुलै ते 28 ऑगस्ट दरम्यान घेण्यात येणार आहेत. (वाचा - UPSC Civil Services Prelims Exam Postponed: यंदाची यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा 27 जून ऐवजी 10 ऑक्टोबरला)

जेएमएआय प्रवेश अर्ज 2021-22 -

जेएमआयने जाहीर केलेल्या प्रवेश कार्यक्रमानुसार, विविध अभ्यासक्रमांतील प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 30 जून 2021 पर्यंत सुरू राहणार आहे. त्याचवेळी, उमेदवारांनी 1 जुलै ते 5 जुलै 2021 पर्यंत त्यांच्या सादर केलेल्या ऑनलाइन अर्जात बदल करण्यास सक्षम असेल. जामियाच्या विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक उमेदवार जेएमएआय, jmi.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर किंवा विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक वेबसाइट jmicoe.in वर जाऊन अधिक माहिती मिळवू शकतात.

प्रवेश परीक्षा 26 जुलै ते 28 ऑगस्ट दरम्यान घेण्यात येणार

जेएमआय प्रवेश कार्यक्रमानुसार, एकूण 134 अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षा 26 जुलै ते 28 ऑगस्ट 2021 दरम्यान घेण्यात येतील. या प्रवेश परीक्षांचे प्रवेशपत्र 15 जुलै 2021 पासून दिले जातील. तथापि, विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या भाषा अभ्यासक्रमांमधील पार्ट टाइम, सर्टिफिकेट, डिप्लोमा आणि भाषा करिता प्रवेश परीक्षांसाठी स्वतंत्र परीक्षा जाहीर केल्या जातील.