Indian Navy SSC IT Recruitment 2021: इंडियन नेव्हीमध्ये ग्रॅज्युएट, पोस्टग्रॅज्युएटसाठी नोकर भरती, जाणून घ्या अर्जप्रक्रियेसंबंधित अधिक

कारण इंडियन नेव्हीमध्ये शॉर्ट सर्विस कमीशनच्या पदावर लवकरच नोकर भरती केली जाणार आहे.

Government Job | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Indian Navy SSC IT Recruitment 2021:  भारतीय नौसेनेत नोकरीची संधी शोधत असलेल्यांसाठी एक खुशखबर आहे. कारण इंडियन नेव्हीमध्ये शॉर्ट सर्विस कमीशनच्या पदावर लवकरच नोकर भरती केली जाणार आहे. त्यानुसार 45 पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 2 जुलै पासून सुरु होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 जुलै दिली गेली आहे. त्यामुळे अंतिम तारखेपूर्वीच उमेदवारांनी पदासाठी अर्ज करावा.

उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी www.joinindiannavy.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यानुसार डियन नेव्हीमध्ये ग्रॅज्युएट, पोस्टग्रॅज्युएट पदासाठी नोकर भरती केली जाणार आहे. तर जाणून घ्या अर्जप्रक्रियेसंबंधित अधिक माहिती.

>>नोटिफिकेशन जाहीर झाल्याची तारीख- 26 जून 2021

>>ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख-02 जुलै 2021

>>ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख- 16 जुलै 2021

>>अॅडमिट कार्ड लवकरच घोषित केली जाणार आहे. त्याचसोबत एसएससी पोस्टसाठी आयोजित होणाऱ्या परिषेदबद्दल ही लवकरच कळवले जाणार आहे.

इंडियन नेव्हीकडून जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार एसएससी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवराने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून कंप्युटर सायन्स/ कंप्युटर इंजिनिअरिंगमध्ये बीटेकची डिग्री घेतलेली असावी. या व्यतिरिक्त कंप्युटर सायन्स, एमसीए आणि एमटेक कंप्युटर आयटी असावे. उमेदवाराचा जन्म 02 जानेवारी 1997 ते 01-07-2002 दरम्यान असावा.

एसएसबीसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या उमेदवारांना ईमेल किंवा एसएमएसच्या माध्यमातून निवड झाल्याचे सांगितले जाणार आहे. तर मेडिकल परीक्षेसाठी एसएसबीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना प्रवेशासाठी बोलावले जाणार आहे. या व्यतिरिक्त मेरिट लिस्ट एसएसबी मध्ये गुणांचा आधारावर मेरिट लिस्ट तयार केली जाणारआहे. या भरती प्रक्रियेसंबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.