Indian Navy Jobs for Women: महिलांसाठी भारतीय नौदलात नोकरीची संधी, विशेष कमांडो म्हणून मिळणार स्थान; वाचा सविस्तर

भारतीय नौदलाने आपल्या एलिट स्पेशल फोर्समध्ये (Elite Special Forces) महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.

Indian Navy | (Photo Credit - joinindiannavy)

भारतातील तमाम महिला वर्गासाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय नौदलाने (Indian Navy) घेतलेल्या एका खास निर्णयामुळे भारतीय महिलांना नोकरी आणि व्यक्तीमत्व विकासाची तसेच जीवनमान उंचावण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. भारतीय नौदलाने आपल्या एलिट स्पेशल फोर्समध्ये (Elite Special Forces) महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे नौदलाच्या तीनपैकी कोणत्याही संरक्षण सेवेत प्रथमच कमांडो (Indian Navy Commandos) म्हणून काम करण्याची परवानगी महिलांना नव्या निर्णयामुळे मिळाली आहे.

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्ताचा हवाला देत टाईम्स नाऊ या संकेतस्थाळाने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार, भारतीय महिलांना आता नौदलामध्ये मरीन कमांडो (Marcos) म्हणून दाखल होता येईल. भारतीय नौदलातील हा अत्यंत महत्त्वाचा आणि दुरगामी निर्णय आहे. आजवरच्या इतिहासात भारतीय नौदलात अशी थेट नियुक्ती केव्हाच करण्यात आली नाही. त्यामुळे लोकांना आगोदर त्यासाठी स्वयंसेवी म्हणून काम करावे लागेल, असा सूर काही ज्येष्ठ नौदल अधिकाऱ्यांनी वर्तवल्याचे समजते. (हेही वाचा,Navy Day 2022: भारतीय नौसेना दिनी भारतीय नौदलाच्या अफाट कामगिरीचा दाखला देणारा व्हिडीओ )

सैन्य, नौदल आणि वायूसेना असे भारतीय लष्कराचे तीन भाग पडतात. लष्कराचे हे तीनही भाग अत्यंत शूर आणि बलवान सौनिक तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनले आहेत. यापैकी कोणत्याही दलात प्रवेश घेण्यासाठी अत्यंत कठोर निवड चाचणी आदींचा सामना करावा लागतो. परंतू, आजवर फक्त पुरुषांनाच या तिन्ही दलात प्रवेश मिळत आला आहे. त्यामुळे महिलांसाठी ही कवाडे खूली होत आहेत. हे विशेष स्वागतार्ग आहे.



संबंधित बातम्या