IIT Bombay Campus Placement: आयआयटी बॉम्बेच्या 85 विद्यार्थ्यांना मिळाले 1 कोटींहून अधिकचे पॅकेज, तर 63 विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल लोकेशनची ऑफर
यंदा 2000 हून अधिक विद्यार्थ्यांनी प्लेसमेंटसाठी नोंदणी केली होती. यापैकी 60% लोकांना पहिल्या टप्प्यात नोकरीच्या ऑफर मिळाल्या आहेत. कॅम्पस प्लेसमेंटमध्ये कंपन्या उमेदवारांशी वैयक्तिकरित्या किंवा व्हर्च्युअल मीटिंग प्लॅटफॉर्मद्वारे संवाद साधतात.
IIT Bombay Campus Placement: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (IIT Bombay) मध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थी रात्रंदिवस मेहनत करतात. यासाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी प्रवेश परीक्षेला बसतात, मात्र केवळ हजारो विद्यार्थीच प्रवेश घेऊ शकतात. आता आयआयटी बॉम्बेने प्लेसमेंटच्या (IIT Bombay Campus Placement) पहिल्या टप्प्यात आपला विक्रम कायम ठेवला आहे. प्लेसमेंटच्या पहिल्या टप्प्यात, आयआयटी बॉम्बेच्या 85 विद्यार्थ्यांना कोट्यावधी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या नोकरीच्या ऑफर मिळाल्या आहेत, तर 63 विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय ऑफर मिळाल्या आहेत.
20 डिसेंबरपर्यंत संस्थेमध्ये 1,340 ऑफर आल्या होत्या, त्याद्वारे 1,188 विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. 2023-2024 च्या प्लेसमेंट सीझनसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय 388 कंपन्या आयआयटी बॉम्बेमध्ये आल्या होत्या. आयआयटी बॉम्बेमध्ये दरवर्षी अनेक परदेशी कंपन्या प्लेसमेंटसाठी येतात. यंदा 63 विद्यार्थ्यांना जपान, दक्षिण कोरिया, नेदरलँड, तैवान, सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. (हेही वाचा: IAF Agniveer Vayu Recruitment 2024: भारतीय हवाई दलात भरती होण्याची उत्तम संधी; लवकरच सुरु होणार अग्निवीर वायुसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, 12वी पास करू शकतात अप्लाय)
या सिझनमध्ये कॅम्पसला भेट देणार्या काही प्रमुख नियोक्त्यांमध्ये Accenture, Airbus, Air India, Apple, Arthur D. Little, Bajaj, Barclays, Cohesity, Da Vinci, DHL, Fullerton, Future First, GE-ITC, Google, Intel, Jaguar Land Rover, JPMorgan Chase, Microsoft, Morgan Stanley, Mercedes-Benz, Reliance Group, Samsung, Schlumberger, Strand Life Sciences, Tata Group, Texas Instruments यांचा समावेश आहे. यामध्ये प्री-प्लेसमेंट ऑफर (पीपीओ) तसेच पीएसयू देणाऱ्या कंपन्यांचा समावेश होता.
यंदा 2000 हून अधिक विद्यार्थ्यांनी प्लेसमेंटसाठी नोंदणी केली होती. यापैकी 60% लोकांना पहिल्या टप्प्यात नोकरीच्या ऑफर मिळाल्या आहेत. कॅम्पस प्लेसमेंटमध्ये कंपन्या उमेदवारांशी वैयक्तिकरित्या किंवा व्हर्च्युअल मीटिंग प्लॅटफॉर्मद्वारे संवाद साधतात. आयआयटी-बॉम्बे कॅम्पसमधील बहुतेक उच्च पगार हे संशोधन आणि विकास क्षेत्रातून आले आहेत. आंतरराष्ट्रीय कंपनीने दिलेला कमाल पगार 29 लाख हाँगकाँग डॉलर (सुमारे 3 कोटी रुपये) आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)