ICAI CA November 2023 Intermediate, Final Result: सीए परीक्षेच्या इंटर आणि फायनल परीक्षेचा निकाल आज लागण्याची शक्यता; icai.nic.in पहा अपडेट्स

निकालासाठी आणि निकालाच्या अपडेट्ससाठी उमेदवारांना नियमित वेबसाईट वरील माहिती पाहत राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Online | Pixabay.com

The Institute of Chartered Accountants of India कडून आज (9 जानेवारी) दिवशी

CA Intermediate आणि Final परीक्षा निकाल जाहीर होणार आहे. ही परीक्षा नोव्हेंबर 2023 मध्ये घेण्यात आली होती. गेल्या गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, उमेदवार त्यांच्या नोंदणी क्रमांकासह रोल नंबर टाकून अधिकृत वेबसाइटवर त्यांचे निकाल पाहू शकतात. icai.nic.in वर निकाल पाहता येणार आहे. ICAI CA Inter परीक्षा पार करण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान 40% प्रत्येक विषयाच्या पेपर मध्ये आणि 50% गुण पूर्ण ग्रुप मध्ये असणं आवश्यक आहे. तसेच ICAI CA Final परीक्षेसाठी देखिल   40% प्रत्येक विषयाच्या पेपर मध्ये आणि 50% गुण पूर्ण ग्रुप मध्ये असणं आवश्यक आहे.

ICAI CA Inter and Final 2023 कसा पहाल?

नोव्हेंबर 2023 सत्रातील ICAI CA Foundation exams डिसेंबर 24,26,28 आणि 30 तारखेला झाली होती तर CA Intermediate exams for November 2023 ही 2, 4, 6, 8 नोव्हेंबरला ग्रुप 1 साठी झाली होती. ग्रुप 2 साठी 10,13,14आणि 17 नोव्हेंबरला झाली होती. यंदा सीए फायनल एक्झाम नोव्हेंबर महिन्यात 1,3,5 आणि 7 ग्रुप 1 आणि नोव्हेंबर 9,11,14 आनि 16 तारखेला ग्रुप 2 साठी झाली होती. नक्की वाचा: CBSE Board Exam 2024 Datesheet: CBSE बोर्डाकडून सुधारित वेळापत्रक झालं जाहीर; 'या' दिवशी होणार दहावी आणि बारावीच्या परीक्षा.

निकालासाठी आणि निकालाच्या अपडेट्ससाठी उमेदवारांना नियमित वेबसाईट वरील माहिती पाहत राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif