IBPS Clerk Prelims Result 2020: आयबीपीएस क्लार्क परीक्षेचा आज निकाल होणार जाहीर; Ibps.in वर असा पहा
यंदा IBPS Clerk Prelims परीक्षा 23 नोव्हेंबर आणि 13 डिसेंबर 2020 दिवशी पार पडल्या होत्या. त्यांचे निकाल आज जाहीर होतील.
आयबीपीएस म्हणजेच The Institute of Banking Personnel Selection च्या यंदाच्या प्रिलिम्स परीक्षांचा निकाल आज (31 डिसेंबर) जाहीर होणार आहे. यंदा या परीक्षा 23 नोव्हेंबर आणि 13 डिसेंबर 2020 दिवशी पार पडल्या होत्या. दरम्यान जारी करण्यात आलेल्या नोटीफिकेशननुसार, IBPS Clerk Prelims Result 2020 हा अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच ibps.in वर जाहीर केला जाईल. हा निकाल जाहीर होताच पात्र विद्यार्थ्यांना मेन्स परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी परवानगी मिळेल. नक्की वाचा: ESIC Recruitment 2020: ईएसआयसीकडून प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी भरती जाहीर; 31 डिसेंबरपर्यंत करा अर्ज.
IBPS Clerk Prelims Result 2020 कसा पहाल?
- निकाल पाहण्यासाठी ibps.in ला भेट द्या.
- होमपेजवर तुम्हांला निकालाची लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्ही नव्या पेजवर रिडिरेक्ट होईल. तुम्हांला लॉगिंग डिटेल्स मिळतील. त्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर, रोल नंबर, डेट ऑफ बर्थ आणि पासवर्ड विचारला जाईल.
- सबमीट क्लिक करा म्हणजे तुम्हांला निकाल पाहता येणार आहे.
- विद्यार्थ्यांना निकालाची प्रत डाऊनलोड करता येणार आहे.
यंदा आयबीपीएस च्या मेन्स परीक्षेचे आयोजन 24 जानेवारी 2021 मध्ये करण्यात आलं आहे. तर त्याचा निकाल एप्रिल 2021 मध्ये जाहीर केला जाणार आहे. ibps.in च्या माहितीनुसार,Institute of Banking Personnel Selection मेंस परीक्षा 4 सेक्शनमध्ये होईल. यामध्ये General/ Financial Awareness, General English, Reasoning Ability & Computer Aptitude आणि Quantitative Aptitude यांचा समावेश असेल. ही 200 गुणांची परीक्षा असेल. अंतिम मेरीट लिस्ट बनवण्यासाठी विद्यार्थ्यांचे मेन्स परीक्षेचे मार्क ग्राह्य धरले जाणार आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Dec 31, 2020 10:32 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

