गलेलठ्ठ पगार देणाऱ्या टॉप 7 कंपन्या; नोकरी करणाऱ्याची हमखास चांदी
तेव्हा, या कंपन्यातील पगारांविषयी जाणून घ्या आणि इथे नोकरी मिळविण्यासाठी काय करता येऊ शकेल यासाठी कामाला लागा.
एखादी कंपनी गलेलठ्ठ पगार देते म्हणजे किती देते? तुम्हाला काही कल्पना? कदाचित नोकरी करणाऱ्या मंडळींना माहिती असेल. पण, नोकरी करणारा आणि त्याला मिळत असणाऱ्या पगारावर समाधानी असलेला व्यक्ती सापडणे म्हणजे कठीणच काम. तसेही, स्वत:ला मिळणारा पगार सांगणारी धाडसी माणसं फारच कमी. त्यामुळे उगाच कुणाला पगार विचारण्याच्या भानगडीत पडू नका. आम्हीच आपल्याला सांगतो गलेलठ्ठ पगार देणाऱ्या कंपन्यांची नावे. नोकरी शोधण्यास मदत करणारी वेबसाईट comparably ने नुकतीच एक यादी जाहीर केली. या यादीत गलेलठ्ठ पॅकेज देणआऱ्या कंपन्यांची नावे आहेत. या कंपन्यात कर्मचाऱ्यांना मिळणारा पगारांचे आकडे ऐकाल तर, अवाक व्हाल. तेव्हा, या कंपन्यातील पगारांविषयी जाणून घ्या आणि इथे नोकरी मिळविण्यासाठी काय करता येऊ शकेल यासाठी कामाला लागा.
गूगल (GOOGLE)
कॅलीफॉर्नियातील माऊंटन व्यू हे आहे गूगलचे हेडक्वार्टर. सरासरी वार्षिक पॅकेज- 161,409 डॉलर (भारतीय रुपयात १ कोटी १९ लाख ). सर्वाधिक वार्षिक पॅकेज आहे 1,98,525 डॉलर इतके. जे इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला मिळते.
फेसबुक (facebook)
फेसबुकचे हेडक्वार्टरसुद्धा कॅलीफॉर्नियातच असून, ते मेनलो पार्क येथे आहे. फेसबुकमध्ये मिळणारे वार्षिक पॅकेज आहे साधारण 156,455 डॉलर (भारतीय रुपयात साधारण १ कोटी १५ लाख रुपये.) सर्वाधिक वार्षिक पॅकेज आहे 188,672 डॉलर (भारतीय रुपयात १ कोटी ३९ लाख ). जे प्रॉडॉक्ट डिपार्टमेंटला मिळते.
सेल्सफोर्स (Salesforce)
सेल्सफोर्सचे हेड क्वार्टर आहे सॅन फ्रन्सिस्को येथे. या कंपनीचे वार्षिक पॅकेज आहे 153,636 डॉलर (भारतीय रुपयांत १ कोटी १३ लाख). सर्वाधिक वार्षिक पॅकेज आहे181,974 डॉलर (भारतीय रुपयात १ कोटी ३४ लाख). जे बिजनेस डेव्हलपमेंट विभागात मिळते.
मायक्रोसॉफ्ट (Microsoft)
मायक्रोसॉफ्टचे हेडक्वार्टर आहे वॉशिंग्टनला. कंपनीचे वार्षिक पॅकेज आहे 152,776 डॉलर (भारतीय रुपयात १ कोटी १२ लाख .) सर्वाधिक वार्षिक पॅकेज आहे 191,558 डॉलर (भारतीय रुपयांत १ कोटी ४१ लाख). जे मिळते पॉडॉक्ट डिपार्टमेंटमध्ये मिळते. (हेही वाचा, भरपूर कमाई करुन देणारे '८' सोपे कोर्सेस !)
नेटफ्लिक्स ( Netflix)
नेटफ्लिक्सचे हेडक्वार्टर आहे लॉस गेटॉस (कॅलीफॉर्निया) येथे. कंपनीचे वार्षिक पॅकेज आहे 152,262 डॉलर (भारतीय रुपयात सुमारे १ कोटी १२ लाख ). सर्वाधिक वार्षिक पॅकेज आहे 202,662 डॉलर ( भारतीय रुपयात सुमारे१ कोटी ४९ लाख ). जे मिळते इंजिनिअरींग विभागात.
अॅपल (Apple )
अॅपलचे हेडक्वार्टर आहे क्यूपर्टिनो (कॅलीफॉर्निया) येथे. कंपनीचे वार्षिक पॅकेज आहे 151,239 डॉलर (भारतीय रुपयात १ कोटी ११ लाख ). जे मिळते इंजिनिअरींग विभागात.
दरम्यान, वर दिलेल्या कंपन्यांमध्ये मिळणारे पॅकेज सतत बदलत असते. तसेच, वेगवेगळ्या विभागात वेगवेगळे पॅकेज असते. त्यामुळे इथे वार्षिक पॅकेज दिले असून, ते सरासरी आहे.