Government Job: ECIL मध्ये 200 रिक्त पदांसाठी नोकरभरती, अभियंता उमेदवारांनी 'या' पद्धतीने करा अर्ज
कारण इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीत 200 रिक्त पदांवर उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत. ECIL ज्युनिअर टेक्निकल ऑफिसर या पदांसाठी नोकरभरती करण्यात येणार आहे.
जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीत 200 रिक्त पदांवर उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत. ECIL ज्युनिअर टेक्निकल ऑफिसर या पदांसाठी नोकरभरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 11 ऑक्टोंबर ही शेवटची तारीख देण्यात आली आहे.
उमेदवारांना या पदासाठी अर्ज करायचा असल्यास कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड कम्युनिकेशन इंजिनिअररिंग मधून पदवी मिळालेली असणे आवश्यक आहे. तर नोकरीच्या पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा.
>>पदाचे नाव:
ज्युनिअर टेक्निकल ऑफिसर
>>पदांची संख्या:
200
>>पात्रता:
कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड कम्युनिकेशन इंजिनिअररिंग मधून पदवी
>>या प्रकारे होणार निवड:
उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज केल्यानंतर एक लेखी परिक्षा द्यावी लागणार आहे. त्यामध्ये पास झालेल्या उमेदवारांना कागपत्रांसह पडताळणीसाठी बोलावले जाणार आहे.
>>या पद्धतीने करा अर्ज:
http://careers.ecil.co.in/advt4019.php या संकेतस्थळावर भेट द्या.
(यंदाच्या दिवाळीपूर्वी सरकार देणार मोठं गिफ्ट, करात कपात करण्याची शक्यता)
तर सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या इंजिनिअर तरुणांनी वरील पद्धतीने अर्ज करु शकता. तसेच नोकरीच्या संबंधित अधिक माहिती इसीआयएलच्या अधिकृत संकेस्थळावरुन मिळवू शकता.