रेल्वेमध्ये 2 हजारांपेक्षा अधिक पदांसाठी नोकर भरती, 10 वी पास असणाऱ्या उमेदवारांना संधी

जर तुम्ही नोकरीच्या शोधात असल्यास तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण रेल्वेत नोकरीची संधी उलपब्ध झाली असून 2 हजारांपेक्षा अधिक जागांवर नोकर भरती करण्यात येणार आहे.

रेल्वेमध्ये 2 हजारांपेक्षा अधिक पदांसाठी नोकर भरती, 10 वी पास असणाऱ्या उमेदवारांना संधी
Railway | Image used for representational purpose | (फोटो सौजन्य-फेसबुक)

जर तुम्ही नोकरीच्या शोधात असल्यास तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण रेल्वेत नोकरीची संधी उलपब्ध झाली असून 2 हजारांपेक्षा अधिक जागांवर नोकर भरती करण्यात येणार आहे.रेल्वेच्या अप्रेंटिच्या विविझ पदांअंतर्गत भरती होणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. तर अर्ज भरण्याची शेवटची तारीख 8 डिसेंबर 2019 असणार आहे. या नोकरीच्या संधीबाबत अधिक माहिती रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावरुन उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्ही या पदांसाठी अर्ज भरण्यास इच्छुक असल्यास पुढील अधिक माहिती जाणून घ्या.

>पदांची संख्या

2029

>योग्यता

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी 10 वी आणि आयटीआय केलेल्या उमेदवारांना संधी मिळणार आहे.

>वयाची अट

उमेदवाराचे वय 15 वर्ष ते 24 वर्षापर्यंत असावे. यापेक्षा अधिक वय असलेल्या SC/ST यांना 5 वर्ष आणि OBC ला 3 वर्षापर्यंत सूट देण्यात येणार आहे.

>या आधारावर होणार निवड

10 वी मधील गुणांच्या आधारवर उमेदवाराची निवड केली जाणार आहे.

>अर्जाची फी

100 रुपये

(खुशखबर! रेल्वेत 10 वी पास युवकांसाठी सरकारी नोकरीची संधी; जाणून घ्या कुठे कराल अर्ज आणि महत्वाच्या तारखा)

तर रेल्वेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना rrcjaipur.in येथून अर्ज करता येणार आहे.तसेच अधिक माहिती सुद्धा याच संकेतस्थळावरुन देण्यात येणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Nov 17, 2019 03:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).