रेल्वेमध्ये नोकरीची संधी, 10 वी मधील गुणांच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाणार
कारण रेल्वेच्या व्हील फॅक्ट्री नेक अप्रेंटिसच्या पदावर नोकर भरती करण्यात येणार आहे. ही नोकर भरती एकूण 192 जागांवर करण्यात येणार असून अर्ज करण्याची शेवटची तारिख 15 नोव्हेंबर आहे. त्याचसोबत उमेदवारांची निवड ही 10 वी मधील गुणांच्या आधारवर करण्यात येणार आहे.
जर तुम्ही शासकीय नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण रेल्वेच्या व्हील फॅक्ट्री नेक अप्रेंटिसच्या पदावर नोकर भरती करण्यात येणार आहे. ही नोकर भरती एकूण 192 जागांवर करण्यात येणार असून अर्ज करण्याची शेवटची तारिख 15 नोव्हेंबर आहे. त्याचसोबत उमेदवारांची निवड ही 10 वी मधील गुणांच्या आधारवर करण्यात येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांची यादी 16 डिसेंबर 2019 रोजी जाहीर करण्यात येणार आहे.त्याचसोबत निवड झालेल्या उमेदवारांना ट्रेनिंग 2 जानेवारी 2020 पासून सुरु करण्यात येणार आहे. तर कोणत्या जागांसाठी नोकर भरती करण्यात येणार आहे त्याबाबत अधिक जाणून घ्या.
1) पदाचे नाव-
अप्रेंटिस
2) एकूण पदांची संख्या-
192
3) शैक्षिणिक योग्यता-
10 वी उत्तीर्ण झालेले उमेदावर
4) वयाची मर्यादा-
उमेदवाराचे वय 15 वर्षांपेक्षा कमी नसावे.
त्यामुळे जर तुम्ही शासकीय नोकरीच्या शोधात असल्यास ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. तसेच उमेदवारांना नोकरी संदर्भात काही शंका असल्यास त्याची अधिक माहिती तुम्हाला रेल्वेच्या अधिकृत संकेस्थळावर देण्यात आली आहे.(खुशखबर! 10 वी पास असणाऱ्यांसाठी Government Job ची सुवर्णसंधी; लेखी परीक्षेशिवाय मिळवा रेल्वेत नोकरी)
तसेच रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाने (RRB)असिस्टंट पायलट आणि टेक्नीशियन पदासाठी महत्त्वाची सूचना प्रसिद्ध केली आहे. पहिल्या टप्प्यात सीबीटी (भरती परीक्षा) साठी अनेक उमेदवारांनी नोकर भरतीसाठी अर्ज केले होते. या उमेदवारांपैकी ज्यांच्याजवळ 12 वी पास ( गणित आणि भौतिकशास्त्र) आणि आयटीआयचे पात्रता प्रमाणपत्र आहे. मात्र, अर्ज करताना त्यांनी त्याची विस्तारीत माहिती दिली नव्हती. अशा मंडळींना आता एक चांगली संधी आहे. असे उमेदवार आपली अतिरिक्त पात्रता उमेदवारी अर्जासोबत जोडू शकतात.