FYJC Admissions 2023 Time Table: 25 मे पासून 11 वी प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनका होणार सुरूवात; SSC निकालाची उत्सुकता शिगेला

आता महाराष्ट्र राज्य बोर्डाचा एसएससीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ही प्रवेशप्रक्रिया सुरू करून महाविद्यालयांमध्ये बोर्डानुसार प्रवेश दिले जाणार आहेत,

Online | Pixabay.com

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल  (Maharashtra Board SSC Result) आता येत्या 2-3 आठवड्यात लागणार आहे. अशामध्ये आता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेची तयारी सुरू झालेली आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे सह 6 विभागीय मंडळांमध्ये यंदा 11वीचे प्रवेश ऑनलाईन (Centralised Admissions For First Year Junior College) केले जाणार आहेत. त्यामध्ये मुंबई, पुणे-पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूरचा समावेश आहे. 20 मे पासून त्या प्रक्रियेला सुरूवात होत आहे. यंदा पहिल्यांदाच औरंगाबादचा या प्रक्रियेमध्ये समावेश करण्यात आला आहे.

11thadmission.org.in या पोर्टलवर 20 मे पासून विद्यार्थी अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी पार्ट 1 भरू शकणार आहेत. तर पार्ट 2 हा निकाल लागल्यानंतर खुला करण्यात येईल. पार्ट 1 साठी देखील प्रत्यक्ष रजिस्ट्रेशन 25 मे पासून सुरू केले जाणार आहे.

कॅप राऊंडच्या मॉक रजिस्ट्रेशन मध्ये विद्यार्थ्यांना फॉर्म कसा भरायचा याचा सराव करता येणार आहे. 20 मे पासूनच ज्युनियर कॉलेज देखील यामध्ये सहभागी होणार आहेत. Maharashtra Board Results 2023 Date: CBSE, CISCE नंतर महाराष्ट्र बोर्डच्या HSC, SSC च्या निकालाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात; मे अखेरीस बारावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता .

पूर्वी प्रमाणेच अल्पसंख्याक (50%), इन-हाउस (10%) आणि व्यवस्थापन (5%) यांसारख्या विविध कोट्यांतर्गत राखीव असलेल्या जागा विशेष फेरीत प्रथम भरल्या जातील. त्यानंतर प्रवेशाच्या तीन नियमित फेऱ्या होणार आहेत. त्यानंतर काही जागा रिक्त राहिल्यास त्या जागांचे दोन विशेष फेऱ्यांमध्ये कोणतेही आरक्षण न करता वाटप केले जाईल. ज्या विद्यार्थ्यांची जागा अद्याप बाकी आहे त्यांच्यासाठी अतिरिक्त 'डेली मेरिट राउंड' असणार आहे.

यंदा 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमधून प्रथम येणार्‍यास प्राधान्य ही सुविधा काढून टाकण्यात आली आहे. यामुळे अनेक चूकीच्या गोष्टी होत असल्याचं मागील काही वर्षात निदर्शास आलं होतं. काही महाविद्यालयं जागा लपवून ठेवत असतं आणि त्यांच्या आवडीच्या विद्यार्थ्यांसाठी त्या खुल्या करत होते. त्याला आता चाप बसणार आहे. यामुळे प्रवेशप्रक्रिया अधिक पारदर्शी आणि वेगवान केली जाणार आहे.

काही दिवसांपूर्वी सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचे निकाल जाहीर झालेले आहेत. आता महाराष्ट्र राज्य बोर्डाचा एसएससीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ही प्रवेशप्रक्रिया सुरू करून महाविद्यालयांमध्ये बोर्डानुसार प्रवेश दिले जाणार आहेत.