CTET 2022: 31 ऑक्टोबरपासून 'हे' उमेदवार करू शकतात सीटीईटीसाठी अर्ज; निगेटिव्ह मार्किंगसंदर्भात जाणून घ्या
इयत्ता 1 ली ते 5 वी साठी शिक्षकांना पेपर 1 आणि इयत्ता 6 वी ते 8 वी साठी पेपर 2 मध्ये उपस्थित राहावे लागेल.
CTET 2022: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने 20 ऑक्टोबर रोजी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) 2022 साठी अधिसूचना जारी केली होती. CTET 2022 च्या अधिसूचनेत बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, CTET 2022 अर्ज प्रक्रिया 31 ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 नोव्हेंबर 2022 असणार आहे हे नमूद करण्यात आलं होतं. पात्र उमेदवारांना ctet.nic.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करता येतील. CBSE CTET 2022 दोन श्रेणींमध्ये (पेपर 1 आणि पेपर 2) शिक्षक पात्रता निश्चित करण्यासाठी आयोजित केले जाईल. इयत्ता 1 ली ते 5 वी साठी शिक्षकांना पेपर 1 आणि इयत्ता 6 वी ते 8 वी साठी पेपर 2 मध्ये उपस्थित राहावे लागेल. तथापि, इयत्ता पहिली ते आठवीसाठी शिक्षक पात्रता मिळविण्यासाठी, उमेदवार दोन्ही पेपरमध्ये उपस्थित राहू शकतात परंतु त्यांच्याकडे पेपरनुसार विहित पात्रता असणे आवश्यक आहे.
CTET साठी 'हे' उमेदवार करू शकतात अर्ज -
सीबीएसईने जारी केलेल्या सीटीईटीच्या पूर्वीच्या अधिसूचनेनुसार, पेपर 1 साठी, उमेदवारांनी 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण आणि 2 वर्षांची डी.एल.एड किंवा 4-वर्षे बी.एल.एड उत्तीर्ण केलेली असावी. B.Ed मध्ये 50% गुण असलेले पदवीधर / PG उमेदवार देखील पेपर 1 मध्ये येऊ शकतात. त्याचप्रमाणे, पेपर 2 साठी, उमेदवारांनी 50% सह 12वी आणि 4-वर्षीय डीएलडी किंवा ग्रॅज्युएशन/पीजी बीएड 50% सह उत्तीर्ण असावे. CTET मध्ये उपस्थित राहण्यासाठी कोणतीही उच्च वयोमर्यादा नाही.
CTET 2022: CTET साठी निगेटिव्ह मार्किंग
गेल्या वर्षी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे, CTET 2022 मध्येही निगेटिव्ह मार्किंग नसण्याची शक्यता आहे. तथापि, अधिक तपशीलांसाठी 31 ऑक्टोबर 2022 रोजी जारी होणार्या माहिती बुलेटिनचा संदर्भ घेणं आवश्यक ठरणार आहे.