Dual Degrees Programme: आता ड्युअल डिग्री प्रोग्रामसाठी प्रवेश मिळवणे होणार सोपे; UGC चे विद्यापीठांना सुलभ यंत्रणा तयार करण्याचे निर्देश

मात्र युजीसी वेबसाइट ugc.ac.in वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या 10 जानेवारी 2023 च्या ताज्या आदेशात असे नमूद केले आहे की, विद्यार्थ्यांना ड्युअल डिग्री प्रोग्राममध्ये प्रवेश घेताना अडचणींचा सामना करावा लागला आहे.

UGC | File Image | (Photo Credits: PTI)

विद्यापीठ अनुदान आयोगाने (University Grants Commission- UGC) भारतातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये आणि उच्च शैक्षणिक संस्थांना विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार दुहेरी पदवी (Dual Degrees Programme) कार्यक्रमांमध्ये प्रवेश घेण्याची परवानगी देण्यासाठी एक सुलभ, सुरळीत प्रक्रिया आणि यंत्रणा विकसित करण्यास सांगितले आहे. मंगळवार, 10 जानेवारी 2023 रोजी जारी केलेल्या ताज्या निर्देशामध्ये, आयोगाने सर्व उच्च शिक्षण संस्थांना या दिशेने वेगाने काम करण्यास सांगितले आहे.

युजीसीने आधीच दुहेरी पदवीसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या दोन पदवी एकाच वेळी मिळवता येतील. मात्र युजीसी वेबसाइट ugc.ac.in वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या 10 जानेवारी 2023 च्या ताज्या आदेशात असे नमूद केले आहे की, विद्यार्थ्यांना ड्युअल डिग्री प्रोग्राममध्ये प्रवेश घेताना अडचणींचा सामना करावा लागला आहे.

उच्च शिक्षण संस्था दुहेरी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून स्थलांतर प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्राचा आग्रह धरत असल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले आहे. आता यूजीसीने जारी केलेल्या सूचनांमध्ये असे नमूद केले आहे की, ही प्रमाण पत्रे नसल्यास, विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला गेला तर, ही गोष्ट एकाच वेळी दोन शैक्षणिक कार्यक्रमांचा पाठपुरावा करण्यात एक अनावश्यक अडथळा असल्याचे सिद्ध होईल.

युजीसीनुसार, विद्यार्थी एकाच वेळी दोन पूर्ण-वेळ शैक्षणिक कार्यक्रम फिजिकल मोडमध्ये करू शकतात. यासाठी एकच खबरदारी घेणे आवश्यक आहे ती म्हणजे, एका प्रोग्रामसाठीच्या क्लासची वेळ दुसऱ्या प्रोग्रामसोबत ओव्हरलॅप होत नाही. यासह विद्यार्थी दोन शैक्षणिक कार्यक्रमांपैकी एक पूर्णवेळ भौतिक मोडमध्ये आणि दुसरा ओपन अँड डिस्टन्स लर्निंग (ODL)- ऑनलाइन मोडमध्येही करू शकतात. (हेही वाचा: तांत्रिक विषयांचे होत आहे मराठीकरण, कायदेविषयक शिक्षणही मराठी भाषेतून देण्यात येणार- Minister Chandrakant Patil)

म्हणूनच यूजीसीने नोटीस जारी करून, एकाच वेळी दोन पदवी अभ्यासक्रम करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुलभ प्रवेश यंत्रणा विकसित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, विद्यापीठ अनुदान आयोग शैक्षणिक सुधारणांचा भाग म्हणून परदेशी विद्यापीठांच्या भागीदारीत संयुक्त आणि दुहेरी पदवी कार्यक्रम सुरू करण्यासाठी कार्यरत आहे. नवीन नियमांनुसार, विद्यार्थ्यांना भारतीय आणि परदेशी उच्च शिक्षण संस्थांमधून- एकाच वेळी दुहेरी पदवी मिळविण्याची परवानगी आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif