DRDO CEPTAM 2022 Recruitment: नोंदणी प्रक्रिया 7 नोव्हेंबरपासून सुरु; जाणून घ्या सर्व तपशील

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था ( Defence Research and Development Organisation) , सेंटर फॉर पर्सोनेल टॅलेंट मॅनेजमेंट (Center for Personnel Talent Management) , DRDO-CEPTAM ने DRDO च्या प्रशासन आणि सहयोगी (A&A) संवर्ग अंतर्गत विविध पदांसाठी रिक्त जागा अधिसूचित केल्या आहेत.

DRDO CEPTAM | (Photo Credits: Archived, Edited, Symbolic Images)

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था ( Defence Research and Development Organisation) , सेंटर फॉर पर्सोनेल टॅलेंट मॅनेजमेंट (Center for Personnel Talent Management) , DRDO-CEPTAM ने DRDO च्या प्रशासन आणि सहयोगी (A&A) संवर्ग अंतर्गत विविध पदांसाठी रिक्त जागा अधिसूचित केल्या आहेत. अर्जाची प्रक्रिया 7 नोव्हेंबरपासून सुरू होईल आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 7 डिसेंबर आहे. इच्छुक उमेदवार www.drdo.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. त्यासाठी सदर लिंक लवकरच सक्रीय होईल.

DRDO CEPTAM 2022 भरती रिक्त जागा: DRDO च्या प्रशासन आणि सहयोगी (A&A) संवर्ग अंतर्गत विविध पदांसाठी 1061 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती मोहीम आयोजित केली जात आहे. (हेही वाचा, India Post Recruitment 2022: भारतीय टपाल विभागात 188 पदांसाठी भरती; परीक्षा आणि मुलाखतीशिवाय होणार निवड)

DRDO CEPTAM 2022 भरती अर्ज शुल्क: सर्व श्रेणींसाठी, ₹100 अर्ज शुल्क आहे. शुल्क भरण्यासाठी आपण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI आदींचा वापर करत शुल्क ऑनलाईन भरणे आवश्यक आहे.

DRDO CEPTAM 2022: अर्ज कसा करावा

  • DRDO च्या अधिकृत साइट drdo.gov.in ला भेट द्या.
  • होम पेजवर, DRDO CEPTAM लिंकवर क्लिक करा
  • अर्ज (फॉर्म) भरा
  • अर्ज सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या. शिवाय एक हार्ड कॉपी डाउनलोड करा. (जी तुम्हाला भविष्यात उपयोगी ठरु शकते.)

DRDO CEPTAM 2022 भरती जाहिरात पीडीएफ इथे पाहा

डीआरडीओ सीईपीटीएएम 2022 भरती जाहिरात-1 (PDF)

डीआरडीओ सीईपीटीएएम 2022 भरती जाहिरात-2 (PDF)

भारताला विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत मजबूत आणि स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने 1958 रोजी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) संस्थेची स्थापना करण्यात आली. ही संस्था पंतप्रधानांच्या शास्त्रीय सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली काम करते. त्यासाठी अत्याधुनिक शस्त्रास्त्र, उपकरणांचा विकास करणे, संशोधन करणे, इतर संस्थांच्या सहकार्याने आणि राष्ट्रीय संशोधन संस्थांच्या साहाय्याने नवीन चाचणी घेणे, संशोधन करणे आदी उपक्रम या संस्थेद्वारे राबवले जातात.

डीआरडीओमध्ये विविध शाखा आहेत. त्यापैकी अभियांत्रिकी, नावेल सिस्सिटम, आर्मामेन्ट टेक्नॉलॉजी, एक्स्पोलॉजी रिसर्च, एरोनॉटिक्स, रॉकेट आणि क्षेपणास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेन्टेशन, व्हेइकल, रोबोटिक्स यांसारख्या काही महत्त्वाच्या मानल्या जातात. संस्थेकडे जवळपास 5000 पेक्षा अधिक मनुष्यबळ आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now