JEE Advanced 2022: जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा 2022 ची तारीख जाहीर, परीक्षा कधी होणार? जाणून घ्या
JEE Advanced 2022: JEE अॅडव्हान्स्ड परीक्षा 2022 ची तारीख जाहीर झाली आहे. IIT बॉम्बेने गुरुवारी JEE Advanced 2022 परीक्षेची तारीख जाहीर केली. IIT बॉम्बेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, JEE Advanced परीक्षा 3 जुलै 2022 रोजी घेतली जाईल. त्याचबरोबर या संदर्भातील नोंदणीची प्रक्रिया 8 जूनपासून सुरू होणार आहे. जेईई मेन परीक्षा (JEE Main Exam 2022) मध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार, ज्यांची रँक 2,50,000 च्या आत असेल. केवळ तेच उमेदवार परीक्षेला बसू शकतील. इच्छुक विद्यार्थी अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर जाऊन इतर माहिती मिळवू शकतात.
जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेत 2022 मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना IIT संस्थांमधील अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जाईल. JEE Advanced 2022 ची प्रवेश परीक्षा, पात्रता यासह माहितीपत्रक IIT Bombay च्या अधिकृत वेबसाइटने प्रसिद्ध केले आहे. IIT बॉम्बेने 14 फेब्रुवारी 2022 रोजी JEE Advanced 2022 ची वेबसाइट सुरू केली होती. (वाचा - Mumbai University घेणार ऑफलाईन परीक्षा, फार्मसी, इंजिनियरिंग सारखे प्रोफेशनल कोर्स असतील अपवाद)
JEE Advanced 2022: वेळापत्रक
- JEE Advanced 2022 साठी नोंदणी - 8 जून ते 14 जून 2022
- JEE Advanced 2022 फी भरण्याची शेवटची तारीख – 15 जून 2022
- JEE Advanced 2022 प्रवेशपत्र कधी जारी केले जाईल - 27 जून 2022
- JEE Advanced 2022 परीक्षेची तारीख - 3 जुलै 2022
उमेदवारांनी JEE Advanced 2022 साठी 8 जून ते 14 जून 2022 या दरम्यान आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण कराची आहे.