CS Foundation Course December 2021 Admit Cards जारी; icsi.edu वरून अशी करा डाऊनलोड
सीएस अॅडमीट कार्ड वर विद्यार्थ्यांचे नाव, परीक्षेची तारीख, सेंटर, टाईम, रजिस्ट्रेशन नंबर आणि परीक्षेचे मिडीयम अशी महत्त्वाची माहिती दिली जाणार आहे.
ICSI कडून CS Foundation Course December Exams ची अॅडमीड कार्ड्स जारी करण्यात आली आहेत. सीएस फाऊंडेशन एक्झाम यंदा 3 आणि 4 जानेवारी 2022 दिवशी होणार आहे. उमेदवार आपली अॅडमीट कार्ड्स अधिकृत वेबसाईट icsi.edu या वेबसाईटवरून डाऊनलोड करू शकणार आहेत. सध्या कोविड 19 संकटाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना अॅडमीट कार्डची कॉपी दिली जाणार नाही त्यांना ते ऑनलाईन डाऊनलोड करावं लागणार आहे. इमेल द्वारा त्यांना अॅडमीट कार्ड (Admit Cards) दिले जाणार आहे.
सीएस अॅडमीट कार्ड वर विद्यार्थ्यांचे नाव, परीक्षेची तारीख, सेंटर, टाईम, रजिस्ट्रेशन नंबर आणि परीक्षेचे मिडीयम अशी महत्त्वाची माहिती दिली जाणार आहे. सीएस फाऊंडेशन परीक्षेमध्ये 8 पेपर असतात.प्रोफेशनल लेव्हल वर असलेल्यांना 9 पेपर द्यावे लागतात. हे देखील वाचा: ICSI CS Admit Card for December 2021 Released: डिसेंबर महिन्यातील CS Executive आणि Professional Program Exam ची अॅडमीट कार्ड्स icsi.edu वरून अशी करा डाऊनलोड.
ICSI CS Admit Card 2021 कसं कराल डाऊनलोड?
- icsi.indiaeducation.net या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- होम पेज वर तुम्हांला अॅडमीट कार्डची लिंक दिसेल.
- 17 अंकी रजिस्ट्रेशन नंबर टाका.
- आता तुमचं हॉल तिकीट/अॅडमीट कार्ड स्क्रिन वर दिसेल.
- ते डाऊनलोड करून ठेवा. नंतर तुम्ही त्याची प्रिंट आऊट देखील काढून ठेवू शकता.
डिसेंबर सत्रातील सीएस एक्झिक्युटीव्ह आणि प्रोफेशनल प्रोग्राम परीक्षा 21 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2021 मध्ये होत आहेत. त्याची अॅडमीट कार्ड्स अशाचप्रकारे मागील आठवड्यात विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
विद्यार्थ्यांना सीएस फाऊंडेशन परीक्षेसंबंधी काही माहिती हवी असल्यास ०१२०-४५२२०० या क्रमांकावर मदत मिळेल. तर तांत्रिक समस्या असेल तर त्यासाठी ९५१३८५००३१ या हेल्पलाइन क्रमांकावर मदत मागता येऊ शकते. वेळोवेळी नवे अपडेट्स पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे.