CRPF Recruitment 2021: फिजियोथेरपिस्ट, न्युट्रीशनिस्ट पदासाठी नोकर भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रियेसंबंधित अधिक माहिती
त्यानुसार योग्य उमेदवारांची रिक्त पदांवर नियुक्ती केली जाणार आहे.
CRPF Recruitment 2021: सेंट्र्ल रिजर्व पोलीस फोर्स (CRPF) मध्ये नोकर भरती संदर्भात घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार योग्य उमेदवारांची रिक्त पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. तर सीआरपीएफमध्ये फिजियोथेरपिस्ट आणि न्युट्रिशनिस्ट पदासाठी नोकर भरती केली जाणार आहे. स्पोर्ट्स ब्रान्च ऑफ ट्रेनिंग डिक्टोरेट, सीआरपीएफ, आरके पुरम, नवी दिल्लीसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. पण ही नोकर भरती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असणार असल्याचे आधीच स्पष्ट केले आहे.
नोकभरती संदर्भात अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. तर फिजियोथेरपिस्ट आणि न्युट्रिशनिस्ट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना काही अटींची पुर्तता करावी लागणार आहे. तर जाणून घ्या अर्ज प्रक्रियेसंबंधित महत्वाच्या तारखा आणि अधिक माहिती.(LIC पॉलिसी असलेल्या नागरिकांसाठी महत्वाची सूचना! येत्या 30 जून पूर्वी करा 'हे' काम)
>>एकूण रिक्त पद
फिजियोथेरपिस्ट-05
न्युट्रीशनिस्ट-01
>>नोकरीचे ठिकाण
-फिजियोथेरपिस्ट: नवी दिल्ली, गुरुग्राम, जालंधर, चंदीगढ,सोनपत
-न्युट्रीशनिस्ट: सीएमसी, जीसी नवी दिल्ली
>>नोकरी वेतन
-फिजियोथेरपिस्ट पदासाठी महिन्याला 50-60 हजार रुपये वेतन
-न्युट्रीशनिस्ट पदासाठी महिन्याला 50-60 हजार रुपये वेतन
>>शिक्षणाची अट
-फिजियोथेरपिस्टसाठी पदासाठी मान्यताप्राप्त भारतीय किंवा परदेशी विद्यापीठातून फिजिओथेरपी (एम.पीटी स्पोर्ट्स) मध्ये पदव्युत्तर पदवी
-न्युट्रीशनिस्ट मध्ये एमससी कोर्स किंवा पीजी डिस्लोमा आणि डायटीशन
फिजियोथेरपिस्ट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 40 वर्षापेक्षा कमी असावे. तर न्युट्रीशनिस्ट पदासाठी अर्ज करणाऱ्यांनी वय 50 पेक्षा कमी असावे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जून 2021 आहे.