CBSE Syllabus Reduction: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता 9 ते 12 पर्यंतच्या अभ्यासक्रमात 30% कपात

त्यास दीड हजारांहूनही अधिक नागरिकांनी भाग घेत सूचना केल्या. त्यावर विचार करुन मग हा निर्णय घेण्यात आला.

CBSE | (Image Used For Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com )

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (Central Board of Secondary Education विभागाने इयत्ता 9 ते 12 पर्यांतचा अभ्यासक्रम सुमारे एक तृतियांश ( 30%) पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड 19 म्हणजेच कोरोना व्हायरस या महासाथीच्या आजाराचा धोका विचारात घेऊन सीबीएसई (CBSE) द्वार हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय मनुष्यबळ विकास (HRD) मंत्री डॉ. रमेश पोखरीयाल (Dr Ramesh Pokhriyal) यांनी हा निर्णय मंगळवारी (7 जुलै 2020) जाहीर केला. कोविड -19 सर्व देशभर असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मार्चच्या मध्यापासून रुटीन वर्गांचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे.

डॉ. पोखरीयाल यांनी माहिती देताना पुढे म्हटले आहे की, “देश आणि जगात सध्या अस्तित्त्वात असलेली विलक्षण परिस्थिती पाहता सीबीएसईला अभ्यासक्रमात सुधारणा करण्याचा आणि इयत्ता 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांवरचा अभ्यासक्रमाचा भार कमी करण्याची मागणी सीबीएसईद्वारा करण्यात आली होती. त्यावर विचार करुन तयार करण्यात आलेल्या अहवालातही वार्षिक अभ्यासक्रम कमी करण्याबाबत सूचविण्यात आले होते त्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचे डॉ. पोखरीयाल यांनी म्हटले आहे.

सीबीएसईच्या इयत्ता 9 वी ते 12 पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम कमी करण्यात यावा किंवा कसे? याबाबत काही आठवड्यांपूर्वीच शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक आणि मार्गदर्शकांच्या सूचना व हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यास दीड हजारांहूनही अधिक नागरिकांनी भाग घेत सूचना केल्या. त्यावर विचार करुन मग हा निर्णय घेण्यात आला. नागरिकांच्या प्रतिसादाबद्धल आभार, असे डॉ. पोरखरियाल यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, University Exams 2020: पदवी च्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन, ऑफलाईन माध्यमातून सप्टेंबर महिन्याच्या शेवटापर्यंत घेण्याच्या UGC च्या सूचना)

मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ट्विटरवर जाहीर केले की, जीवनातील यशात शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन आणि मूलभूत संकल्पना कायम ठेवून अभ्यासक्रमात 30०% इतकी तर्कसंगत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात, भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेने (सीआयएससीई) शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी आयसीएसई (इयत्ता दहावी) आणि आयएससी (इयत्ता 12 वी) इयत्तेच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्याची घोषणा केली आहे. गेल्या तीन महिन्यांपासुन सुरु असलेला कोरोना व्हायरस विषाणूचा प्रादुर्भाव आणि शाळा व महाविद्यालये पुन्हा सुरु करण्याबाबत असलेल्या तारखेच्या अनिश्चिततमेमळे हा निर्णय घेण्यात आला आहे.