Coal India Limited Recruitment 2022: कोल इंडिया लिमिटेड मध्ये 'या' पदावर नोकर भरती, 1 मार्च पर्यंत करता येईल अर्ज
त्यानुसार एकूण 14 पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. अशातच इच्छुक आणि योग्य उमेदवारांना जर अर्ज करायचा असेल तर त्यांनी अधिकृत बेवसाइट coalindia.in येथे भेट द्यावी.
Coal India Limited Recruitment 2022: कोल इंडिया लिमिडेटने जनरल मॅनेजर आणि चीफ मॅनेजर पदासाठी नोकर भरती करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार एकूण 14 पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. अशातच इच्छुक आणि योग्य उमेदवारांना जर अर्ज करायचा असेल तर त्यांनी अधिकृत बेवसाइट coalindia.in येथे भेट द्यावी. येथे देण्यात आलेली नोटिफिकेशन व्यवस्थित वाचल्यानंतरच अर्ज करावा. कारण अर्जात चुक झाल्यास तो स्विकारला जाणार नाही आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 मार्च आहे. तसेच अंतिम तारखेनंतर कोणताही अर्ज स्विकारला जाणार नसल्याचे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे.(Air Force Recruitment: भारतीय वायुसेनेत अप्रेंटिसच्या पदावर काम करण्याची संधी, 80 रिक्त पदांवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल)
नोटीफिकेशननुसार, चीफ मॅनेजर 10 आणि जनरल मॅनेजरच्या 4 पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. ज्या उमेदवारांना या पदावर अर्ज करायचा असेल त्यांनी विस्तृत अधिसुचनेच्या माध्यमातून शैक्षणिक योग्यता पहावी. तसेच वयाची अट, महत्वाची कागदपत्र यांच्याबद्दलच्या माहितीसाठी सुद्धा अधिकृतकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.(RBI Assistant Recruitment: आरबीआयमध्ये 950 सहाय्यक पदासाठी नोकर भर्ती, जाणून घ्या योग्यतेसह अर्ज प्रक्रियेबद्दल अधिक)
कोल इंडिया लिमिटेड ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, जनरल आणि चीफ मॅनेजर या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार, ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी भरलेला अर्ज कोल इंडिया लिमिटेड, "कोयाला भवन", परिसर क्र. -04, MAR प्लॉट क्रमांक AF-III, अॅक्शन एरिया-1A, न्यू टाऊन, राजारहाट, कोलकाता-700156. त्याच वेळी, या भरती प्रक्रियेशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.