UPSC Aspirants साठी गुडन्यूज! Coronavirus Pandemic मुळे युपीएससीची परीक्षा Last Attempt हुकलेल्यांना अजून एक संधी देण्याला केंद्र सरकारची तयारी
ज्यांची UPSC Civil Services exam 2020 प्रिलिम्स देण्याची संधी कोविड 19 मुळे गेली असेल त्यांना अजूनही त्यांचं स्वप्न साकार होण्याची आशा आहे.
केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयामध्ये दिलेल्या माहितीनुसार, कोविड 19 संकटामुळे यंदा ज्यांचा यूपीएससीची परीक्षा देण्याचा शेवटचा चान्स होता त्यांना आता अजून एक संधी देण्यासाठी त्यांनी अनुमती दर्शवली आहे. त्यामुळे ज्यांची UPSC Civil Services exam 2020 प्रिलिम्स देण्याची संधी कोविड 19 मुळे गेली असेल त्यांना अजूनही त्यांचं स्वप्न साकार होण्याची आशा आहे.
सर्वोच्च न्यायालयात आज रचना सिंह या याचिकेकर्तेने यूपीएससीची परीक्षा देण्याचा अजून एक चान्स मिळावा यासाठी याचिका आली होती. त्यावर सुनावणी झाली. दरम्यान यंदा ऑक्टोबर 2020 मध्ये युपीएसीची preliminary exam पार पडली आहे. 4 ऑक्टोबरला ही परीक्षा झाली पण मूळात ती मे महिन्यात होणं अपेक्षित होतं. पण कोविड 19 चा मे 2020 मधील प्रभाव पाहता ती पुढे ढकलण्यात आली होती.
सप्टेंबर 2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि यूपीएससीला यंदा ज्या विद्यार्थ्यांची ही स्पर्धा परीक्षा देण्याची अखेरची संधी होती त्यांच्या अप्पर एज लिमिट म्हणजे कमाल वयोमर्यादेमध्ये वाढ करण्याचे आदेश दिले होते.
DOPT कडून 26 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात देण्यात आलेल्या माहितीनुसार कमाल वयोमर्यादा वाढवण्यासाठी विचारप्रक्रिया संबंधित यंत्रणेकडून सुरू आहे. मात्र 22 जानेवारीला केंद्र सरकार अशाप्रकारे परीक्षेची शेवटची संधी असणार्यांना मुदतवाढ देण्याच्या तयारीत नसल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलं होतं. UPSC CDS I 2021 Admit Card Released: युपीएससी सीडीएस परीक्षेचे ई अॅडमीट कार्ड upsc.gov.in वरून 7 फेब्रुवारीपर्यंत असं करा डाऊनलोड.
केंद्राने 4 ऑक्टोबरला झालेल्या परीक्षेत 4,86,952 विद्यार्थी सामोरे गेल्याचंही स्पष्ट केले आहे. आता main exam of Civil Services 2020 पार पडलेली आहे. 8-17 जानेवारी दरम्यान ही परीक्षा झाली. प्रिलिम्सच्या परीक्षेवरून दहा हजार उमेदवारांची मेन्ससाठी निवड झाली आहे. आता 10 फेब्रुवारीला Civil Services exam 2021 चं नोटीफिकेशन जारी केले जाणार आहे. त्यामध्ये आता विद्यर्थ्यांना या शेवटच्या संधीच्या मुदतवाढेबाबत सरकार काही गूडन्यूज देऊ शकतं अशी आशा पल्लवित झाली आहे.