CBSE Board Exams 2021: सीबीएसई च्या 9 वी, 10, 11 आणि 12 वीच्या परीक्षा पॅटर्नमध्ये झाला बदल; आता परीक्षेत येतील 'अशा' स्वरुपाचे प्रश्न, वाचा सविस्तर
आतापर्यंत दहावीच्या परीक्षेत लघू आणि दीर्घ उत्तर प्रश्न 70 टक्के विचारले जात असत.
CBSE Board Exams 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) सत्र 2021-22 च्या 9 वरून 12 वी पर्यंतच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बदलले आहे. हा बदल या सत्रापासून लागू होईल. याबाबतची माहिती सर्व शाळांना पाठविण्यात आली आहे. बोर्डाच्या मते, दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेत लघू आणि दीर्घ उत्तर प्रश्न 10 टक्क्यांनी कमी विचारण्यात येतील. आतापर्यंत दहावीच्या परीक्षेत लघू आणि दीर्घ उत्तर प्रश्न 70 टक्के विचारले जात असतं. त्याच वेळी, बारावीसाठी 60 टक्के लघू आणि दीर्घ उत्तरे विचारण्यात येत होते. परंतु, मंडळाने त्यात दहा टक्क्यांनी घट केली आहे.
त्याचबरोबर, दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांमध्ये क्षमता आधारित प्रश्न जोडले गेले आहेत. नवीन शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत मंडळाने हा बदल केला आहे. विद्यार्थ्यांची विचार करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी आता 9 वी आणि अकरावीच्या वार्षिक परीक्षा व बोर्ड परीक्षांमध्ये क्षमता आधारित प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. नववी व दहावी बोर्ड परीक्षेत 30 टक्के आणि 12 वीच्या बोर्ड परीक्षेत 20 टक्के क्षमता प्रश्न असतील. आतापर्यंत क्षमता-आधारित प्रश्न विचारले गेले नाहीत. (वाचा - Maharashtra Board SSC Exam 2021: महाराष्ट्र बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द, बारावीची परीक्षा होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय )
दरम्यान नव्या बदलानुसार, नववी व दहावी बोर्ड परीक्षेत क्षमता आधारित प्रश्न 30% (बहुविध निवड, केस स्टडी, इंटिग्रेटेड टाइप प्रश्न असतील) असतील. तसेच 20 वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न असतील. तसेच लघू आणि दीर्घ प्रश्नांचे स्वरुप 60 टक्क्यांवरून 50 टक्क्यांपर्यंत करण्यात आले आहे.
याशिवाय 11 व 12 वी च्या बोर्ड परीक्षेसाठी 20 % प्रश्न क्षमतेवर आधारित असतील (त्यात केस स्टडी, मल्टीपल चॉइस, इंटिग्रेटेड प्रकारचे प्रश्न असतील). तसेच 20 वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न असतील. लघू आणि दीर्घ प्रश्नांचे स्वरुप आता 70 टक्क्यांवरून 60 टक्के करण्यात आले आहे.