CTET Online Application 2021 Date: सीबीएसई कडून CTET च्या रजिस्ट्रेशन साठी 25 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ

दरम्यान ज्यांना आपल्या अर्जामध्ये किंवा परीक्षा केंद्रांवर बदल करायचा आहे त्यांना 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे.

CBSE | (Photo Credit: ANI)

सीबीएसई कडून Central Teacher Eligibility Test (CTET) साठी अर्ज करण्याच्या तारखेमध्ये आता बदल करण्यात आला आहे. 19 ऑक्टोबर ऐवजी आता 25 ऑक्टोबर पर्यंत अर्ज स्विकारले जाणार आहेत. जारी करण्यात आलेल्या नोटीशीनुसार, 26 ऑक्टोबर दिवशी 3.30 वाजेपर्यंत इच्छुक उमेदवार आपले प्रवेश शुल्क भरू शकणार आहेत. यंदा सीबीएसई कडून 16 डिसेंबर ते 13 जानेवारी पर्यंत 15वी Central Teacher Eligibility Test घेतली जाणार आहे.

यंदा सीबीएसई कडून घेण्यात येणारी ही Central Teacher Eligibility Test ऑनलाईन मोड मधील असणार आहे. म्हणजेच कम्युटर बेस्ड टेस्टचा त्यामध्ये समावेश असणार आहे. यंदा 20 सप्टेंबर पासून त्यासाठी अर्जप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नक्की वाचा: Maharashtra TET 2021 Revised Exam Date: शिक्षक पात्रता परीक्षा आता 31 ऑक्टोबरला; 14 ऑक्टोबरला जारी होणार हॉल तिकीट .

सीबीएसई च्या नव्या नोटिफिकेशननुसार, यंदा लेह मध्ये अजून एक परीक्षा केंद्र सुरू करण्यात आले आहे. दरम्यान ज्यांना आपल्या अर्जामध्ये किंवा परीक्षा केंद्रांवर बदल करायचा आहे त्यांना 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. इथे नोटीस वाचा सविस्तर .

इयत्ता 1ली ते 8 वी साठी शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी उमेदवारांची पात्रता निश्चित करण्यासाठी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) वर्षातून दोन वेळेस घेतली जाते. CTET परीक्षा पेपर 1 आणि पेपर 2 साठी दोन सत्रांमध्ये घेतली जाते. CTET पेपर 1 साठी आहे ज्या उमेदवारांना इयत्ता 1-5 आणि पेपर 2 ज्यांना 6-8 वर्ग शिकवायचे आहेत. जे उमेदवार इयत्ता 1-8 शिकवू इच्छितात त्यांना दोन्ही पेपर घेणे आवश्यक आहे.