CBSE Board Exams 2024: सीबीएसई च्या बोर्ड परीक्षेमध्ये Private Candidates म्हणून अर्ज दाखल करण्याची तारीख जाहीर

12 सप्टेंवर ते 11 ऑक्टोबर दरम्यान विनाशुल्क आणि 12 ते 19 ऑक्टोबर सशुल्क अर्ज दाखल केला जाऊ शकतो.

Students | Representational Image | (Photo Credits: PTI)

The Central Board of Secondary Education अर्थात सीबीएससी कडून 2024 च्या बोर्ड परीक्षांसाठी खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी करण्यासाठी 10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांकरिता तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. अधिकृत वेबसाईट cbse.gov.in वर विद्यार्थी आपला अर्ज सादर करू शकणार आहेत. याकरिता 12 सप्टेंवर ते 11 ऑक्टोबर दरम्यानचा महिन्याभराचा वेळ देण्यात आला आहे. तर विलंब शुल्क भरून विद्यार्थी 12 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर पर्यंतही अर्ज करू शकणार आहेत. यासाठी 2000 रूपये विलंब शुल्क आकारलं जाणार आहे.

सीबीएससी कडून खाजगी विद्यार्थ्यांसाठीही परीक्षा अधिकृत वेबसाईट वर दिलेल्या अभ्यासक्रमाच्या आधारितच घेतली जाणार आहे. 2024 च्या बोर्ड परीक्षेमध्ये खाजगी विद्यार्थ्यांच्या कॅटेगरीची यादी देखील जारी करण्यात आली आहे.

खाजगी विद्यार्थी म्हणून कोण अर्ज करू शकतं?

दरम्यान विद्यार्थ्यांनी बोर्डाकडून वेळोवेळी दिली जाणारी माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर लक्ष ठेवणं आवश्यक असल्याचं सांगण्यात आले आहे.