CBSE Board Exams 2021 Datesheet: सीबीएसई बोर्ड दहावी आणि बारावीच्या परीक्षेची 'डेट शीट' जाहीर, 'इथे' जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची बोर्डाच्या परीक्षेची तारीख पत्रक प्रसिद्ध केले आहे. बोर्ड परीक्षा 4 मे ते 10 जून या कालावधीत ऑफलाइन पद्धतीने घेतली जाईल.
सीबीएसई बोर्ड दहावी आणि बारावीच्या परीक्षेची डेट शीट (CBSE Board Exams 2021 Datesheet) जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी बोर्डाच्या परीक्षेचे तारीख पत्रक प्रसिद्ध केले आहे. बोर्ड परीक्षा 4 मे ते 10 जून या कालावधीत ऑफलाइन पद्धतीने घेतली जाईल. वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर उमेदवार cbse.nic.in वेबसाइटवर डेटशीट तपासू शकतात आणि तपशील डेटशीट डाउनलोडदेखील करू शकतात, 1 मार्चपासून प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे. 15 जुलैपर्यंत परीक्षेचा निकाल जाहीर होईल. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक गेल्या अनेक दिवसांपासून या डेटशीटची प्रतीक्षा करत होते, आता अखेर ती जाहीर करण्यात आली आहे.
सीबीएसई 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांसाठी सीबीएसई बोर्ड परीक्षा 2021 चे प्रवेश पत्र एप्रिल 2021 मध्ये दिले जाऊ शकते. सीबीएसई 10, 12 चे निकाल 15 जुलै 2021 पर्यंत घोषित केले जातील. यावेळी वर्ग नसल्यामुळे अभ्यासक्रम 30% कमी झाला आहे. मागील वर्षी दहावीच्या परीक्षेला सुमारे 18 लाख विद्यार्थी हजर होते. दहावीच्या परीक्षेत एकूण 91.46 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. सीबीएसई दर वर्षी पहिल्या दहा आलेल्या विद्यार्थ्यांची नावे जाहीर करते. (हेही वाचा: UGC NET 2021 Exam Dates: JRF, Assistant Professor साठी यंदाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; ugcnet.nta.nic.in वर रजिस्ट्रेशन सुरू)
दरम्यान, सीबीएसई 10, 12 च्या पर्यायी परीक्षा वेगवेगळ्या दिवशी घेण्यात येतील जेणेकरून सामाजिक अंतर कायम राखता येईल. जेईई मेन परीक्षा 24 मे रोजी घेण्यात येणार आहे, त्यामुळे जेईई मेन परीक्षा 2021 परीक्षेपूर्वी गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र परीक्षा घेण्यात येणार आहेत. सीबीएसई 10-12 परीक्षा 2021 कोरोना विषाणू साथीची मार्गदर्शक तत्त्वे लक्षात घेऊन घेण्यात येईल.