CBSE Board Exam 2023: 10वी, 12वी च्या बोर्ड परीक्षांसाठी Private Students Registration 17 सप्टेंबर पासून होणार सुरू

सीबीएसई बोर्ड खाजगी विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन 17 सप्टेंबर पासून सुरू करणार आहे.

CBSE | (Photo Credit: ANI)

सीबीएसई बोर्डाने (CBSE Board) दिलेल्या माहितीनुसार, आता 2023 च्या बोर्ड परीक्षांमध्ये खाजगी विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन (Private Students Registration) 17 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. अ‍ॅप्लिकेशन फॉर्म (Application Form) प्रसिद्ध झाला की 12वी बोर्ड परीक्षेसाठी, 10वी बोर्ड परीक्षेसाठी त्यांच्याकडून अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. यासाठी त्यांना सीबीएसई बोर्डाची अधिकृत वेबसाईट cbse.gov.in ला भेट द्यावी लागणार आहे.

10वी, 12 वी च्या बोर्ड परीक्षेच्या फेब्रुवारी ते एप्रिल 2023 मध्ये घेतल्या जातील असा अंदाज आहे. आता कोविड 19 चं संकट कमी झाल्याने पूर्वीप्रमाणे बोर्ड परीक्षा एकाच टर्म मध्ये घेतली जाईल. त्यासाठी आता अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2022 असणार आहे. हे देखील नक्की वाचा: CBSE बोर्डाचा दिलासा; परदेशात विद्यार्थ्यांना सीबीएसई संलग्न शाळांमध्ये प्रवेशासाठी आता बोर्डाकडून पूर्व परवानगीची गरज नाही .

CBSE Board Exam Registration 2023 कसं कराल?

सीबीएससी बोर्डाची जनरल कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांची 5 विषयांची रजिस्ट्रेशन फी 1500 रूपये आहे. तर अधिकच्या विषयांसाठी 300 रूपये प्रति विषय मोजावे लागतात. देशभरातील खाजगी आणि सरकारी शाळांमध्ये आता सीबीएसई बोर्डाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.