ICSE, CBSE 2020 Results Date: 10वी 12वी चे निकाल जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत लावण्याची तयारी; बोर्डाची सर्वोच्च न्यायालयात माहिती
मात्र सरासरी गुण देण्याच्या पद्धतींमध्ये थोडा फरक आहे.
देशभरामध्ये कोरोना व्हायरसमुळे भीतीचं वातवरण निर्माण झाल्याने अशा परिस्थितीमध्ये सीबीएससी (CBSE) आणि आयसीएसई (ICSE ) बोर्डाने यंदाच्या 10 वी 12वीच्या परीक्षा रद्द करण्याची तयारी दाखवली आहे. याबाबत सुरू असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीमध्ये आज (26 जुलै) निकालाबाबतही चर्चा झाली आहे. सरासरी गुणदान पद्धतीच्या आधारे यंदा सीबीएसई आणि आयसीएसई बोर्ड जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत निकाल लावू शकतात अशी माहिती देखील त्यांनी आज सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. CBSE Board Exams 2020: सीबीएसई ने रद्द केल्या 1-15 जुलै दरम्यान होणार्या 10वी, 12 वीच्या परीक्षा; सॉलिसिटर जनरल तुषार मेहता ने SCला दिली माहिती.
दरम्यान दोन्ही बोर्डांकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या बोर्डाची परीक्षा रद्द झाली असली तरीही सरासरी गुणांप्रमाणे खूष नसलेल्यांसाठी भविष्यात पुन्हा परीक्षांचे नवं वेळापत्रक जाहीर करून परीक्षा देण्याची संधी विद्यार्थ्यांना दिली जाईल अशी माहितीदेखील आज सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली आहे.
PTI Tweet
ICSE बोर्डाचे वकील जयदीप गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही बोर्डांची अॅफिडेव्हिट्स थोड्या फार फरकाने सारखीच आहेत. मात्र सरासरी गुण देण्याच्या पद्धतींमध्ये थोडा फरक आहे.
यंदा फेब्रुवारी -मार्च 2020 मध्ये दोन्ही बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या होत्या. काही विषयांचे पेपर झाले आहे. मात्र तेव्हापासून देशात कोरोनाची दहशत पसरायला सुरूवात झाली आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा पाहता परीक्षा लांबणीवर टाकल्या होत्या. जुलै महिन्यात पुन्हा परीक्षा घेण्याची तयारी होती मात्र महाराष्ट्र, दिल्ली सह देशात कोरोना बाधितांचा वाढता आकडा पाहता आता ही रद्द करण्याची तयारी बोर्डाकडून दाखवण्यात आली आहे.